रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी व पोदार इंटरनेशनल स्कूल यांचे सयुक्त विद्यमाने आज जागतिक पर्यावरण दिन साजरा केला, ज्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जागरूकता वाढवण्यासाठी आणि शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी प्रभावी उपक्रमाची मालिका आयोजित करण्यात आली.
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचा माधुरी कळंबटे तसेच पोदार इंटरनेशनल स्कूल चा प्राचार्या सौ.प्राजक्ती गायकवाड यांनी विद्यार्थ्याना प्रेरणादाई मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये सहभागी होण्यास यशस्वीरित्या प्रेरित केले.
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी यांचे वतीने बियाणांचा बॉल विद्यार्थांना वितरित करण्यात आले. या बियाणांचा बॉल वापर करून जे विद्यार्थी झाडाचे संगोपन करून झाड वाढवतील त्यांना एक वर्षा नंतर पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्याचे जाहीर करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी पोदार स्कूलचे प्राचार्य सौ.प्राजक्ती गायकवाड,रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष रुपेश पेडणेकर,सचिव अॅड.मनिष नलावडे,खजिनदार माधुरी कळंबटे प्रेसिंडेंट इलेक्ट प्रमोद कुलकर्णी,सेक्रेटरी इलेक्ट रोहित विरकर,रोटे.तन्वी साळुंखे तसेच पोदारचे शिक्षक वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करणेसाठी रोटरी इंटरॅक्ट क्लब ऑफ पोदार इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी सदस्य,पोदार स्कूलचे अमोल शिवलकर सर,आरवी पाटील मॅडम,सपना साप्ते मॅडम यांनी परिश्रम घेतले.