लांजालांजा कॉलेज परिसर रहिवासी संघाच्यावतीने घरकाम करणाऱ्या महिलांचा करण्यात आला सन्मान

लांजा कॉलेज परिसर रहिवासी संघाच्यावतीने घरकाम करणाऱ्या महिलांचा करण्यात आला सन्मान

रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे कॉलेज संघाच्यावतीने परिसर रहिवासी आयोजित स्नेहसंमेलन, सत्कार समारंभ आणि सत्यनारायण पूजा असा संयुक्त कार्यक्रम पार पडला. या निमित्ताने घरकाम करणाऱ्या महिला भगिनींचा साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला.
आपण ज्या परिसरात राहतो तेथील समस्या सोडविण्यासाठी येथील रहिवाशांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ग्रुप करून एकत्र येण्याचा निर्णय घेतला. कॉलेज परिसरातील भाई चौगुले, दिनेश झोरे, मुबारक शेख, मंगेश मोरे, बळवंत शिंदे,
चंद्रकांत कदम सर व
विलास गोरे सर, देवळेकर व वासंती संकुलमधील दिनेश चाल्लावड,सूर्यकांत गव्हाणकर, नचिकेत शेट्ये, जयेश शेट्ये हे सर्व एकत्र आले. अध्यक्षपदी दिनेश झोरे यांची निवड करण्यात आली.
कॉलेज परिसर रहिवासी संघाच्यावतीने दिनांक २४ एप्रिल रोजी सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने मुलांचे फनी गेम्स,
परिसरातील गुणवंत व्यक्ती, गुणवंत मुलांचा सत्कार सोहळा तसेच घरेलू काम करणाऱ्या महिला भगिनी यांचा साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे लांजा क्र. ५ व वनगुळे शाळेचे नासा/इस्रोमध्ये उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिका विजया लक्ष्मी देवगोजी यांनी भविष्यात या ठिकाणी मंडळाने वाचनालय सुरू करावे असे मनोगत व्यक्त केले. यावेळी अध्यक्ष भाषणात दिनेश झोरे यांनी भविष्यात सामाजिक बांधिलकी जोपासत विविध उपक्रम राबवण्याचा या मंडळाचा मानस असल्याचे सांगितले.

Breaking News