लांजालांजा राजापूर साखरपा विधानसभेचे कार्यतत्पर आमदार श्री किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या...

लांजा राजापूर साखरपा विधानसभेचे कार्यतत्पर आमदार श्री किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या प्रयत्नातुन लांजा आगाराला पुन्हा मिळाल्या नवीन पाच एसटी बस गाड्या

लांजा – राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार श्री किरण उर्फ भैय्यांशेठ सामंत यांच्या पाठपुरावा आणि प्रयत्नातून लांजा एस.टी. आगाराला यापूर्वी 5 नव्या एस.टी. गाड्या मिळालेल्या असताना आतापुऊ त्यांच्या प्रयत्नातून नव्या 5 गाड्या उपलब्ध झाल्या आहेत या गाड्यांमुळे ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांचा एस.टी.प्रवास अधिक सुखद आणि सुखकारक होणार असल्याचा विश्‍वास श्री. किरण सामंत यांनी व्यक्त केला आहे.
खाजगी गाड्यांच्या वाढत्या वापरामध्ये आजही ग्रामीण भागातील प्रवाशांना गावोगावच्या संपर्क आणि दळवळणासाठी एस.टी. गाड्या महत्वाच्या ठरत आहेत. मात्र, काहीवेळा गाड्या अपुर्‍या ठरत असल्याने काही मार्गावरील एस.टी.च्या फेर्‍या रद्द होत असल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय होते. प्रवाशांची ही गैरसोय लक्षात घेवून राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार श्री किरण उर्फ भैय्यांशेठ सामंत यांनी मतदारसंघातील एस.टी. डेपोंना एस.टी. गाड्या उपलब्ध व्हाव्यात म्हणून परिवहन मंत्री आणि एस.टी. महामंडळाकडे सातत्याने प्रयत्न आणि पाठपुरावा केला आणि अखेर लांजा वासियांचे भाग्यच आहे येवढ्या कमी वेळात उत्कृष्ट कामगिरी करणारे आमदार म्हणून लाभले लांजा वासियाच्या तसेच शिवसैनिक युवासेना शहराधिकारी श्री प्रसाद भाईशेट्ये लांजा डेपो मॅनेजर सौ कांव्या पेडणेकर मॅडम सर्व एस्टी डेपो कर्मचारी शिवसैनिक लांजावासिय जनता यांच्या मार्फत आमदार साहेबांचे खूप खूप आभार..

Breaking News

‘सिंदूर रक्तदान महायात्रा’ ही भारतीय सैनिकांना रक्तदान करणारा देशातील पहिला उपक्रम-

जम्मू येथील एम्स रुग्णालयात सांगलीवरून आलेल्या सिंदूर रक्तदान महायात्रेचा...

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 11/08/2025

१) मंडणगड - 12.25 मिमी२) खेड - 21.42 मिमी३)...