Uncategorizedलाडक्या बहिणींना पुढचा हप्ता मिळणार नाही ? कारण काय?

लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता मिळणार नाही ? कारण काय?


महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना राबवली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेत महिलांना २१०० रुपये दिले जाण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. या योजनेत आतापर्यंत महिलांच्या खात्यात ७ वा हप्ता जमा झाला आहे. या योजनेतील निकष बदलणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र, मंत्री आदिती तटकरेंनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.*

एकाच योजनेचा लाभ

लाडकी बहीण योजनेत फक्त पात्र महिलांनाच मदत मिळणार आहे. तसेच ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला फक्त एकाच योजनेचा लाभ मिळणार आहे.

योजनेच्या अटी (Ladki Bahin Yojana Eligibility)

  • योजनेचा लाभ घेणारी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
  • महिलेचे वय २१ ते ६५ वयोगटातील असावे.
  • या योजनेत लाभ घेणाऱ्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरत नसावे.
  • जर महिला सरकारी नोकरीत असेल तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहने आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे.

लाडकी बहीण योजनेत अर्जांची पडताळणी सुरु

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे. यामध्ये अपात्र महिलांचे अर्ज बाद केले जाणार असल्याचं आदिती तटकरेंनी सांगितले आहे. या योजनेत आतापर्यंत अनेक महिलांना स्वतः हून अर्ज माघारी घेतले आहे. पात्र नसल्याने सांगत त्यांनी अर्ज परत केले आहेत. त्यामुळे अपात्र महिला जर या योजनेचा लाभ घेत असाल तर त्यांनी स्वतः हून माघार घ्यावी, असं आवाहन आदिती तटकरे यांनी केलं आहे.

Breaking News