या उपक्रमामार्फत महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक (MSMEs) आता केवळ स्थानिकच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या उत्पादनांची निर्यात करण्यास सज्ज झाले आहेत – ही अत्यंत गौरवाची बाब आहे. भूतान, मलेशिया, ओमान यांसारख्या देशांमध्ये निर्यात करण्यासाठी इच्छुक असलेले आपल्या राज्यातील तरुण उद्योजकांचे अर्ज पाहताना महाराष्ट्राच्या प्रगतीची नवी दिशा स्पष्ट दिसते.
कोकणातील रत्नागिरी हापूस आंब्याला मिळालेला “एक नंबर” स्थान, हा केवळ सामाजिक माध्यमांवरील चर्चा नाही, तर आमच्या शेतकऱ्यांच्या अथक मेहनतीचं फलित आहे – आणि हा हापूस एकदा परदेशी पाहुण्यांच्या जिभेवर गेला की, दुसऱ्या आंब्याची आठवणसुद्धा येणार नाही, एवढा तो उत्कृष्ट आहे!
“या कार्यक्रमाचे फलित केवळ संवादापुरते मर्यादित न राहता, महाराष्ट्राच्या उत्पादनांची जागतिक बाजारात प्रतिष्ठा निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे, असे यावेळी बोलताना ना. डॉ उदय सामंत ह्यांनी म्हटले आहे
गौरवाचे काही टप्पे:
- मागील तीन वर्षांत महाराष्ट्रात ₹15.74 लाख कोटींपर्यंत गुंतवणूक आकर्षित करण्यात यश.
- “पैठणीपासून ते कोल्हापुरी चपलांपर्यंत” – आपली पारंपरिक उत्पादने प्रत्येक आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचवण्याचा संकल्प.
- MSME क्षेत्रासाठी उद्योजकांना airport-level प्रदर्शन संधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन.
संकल्प
“आज १५ मिनिटं भेट झाली, उद्या प्रत्येक परदेशी पाहुण्याशी संवाद साधण्यासाठी १५० टेबल्स उभारू. आणि पुढील वर्षी, हे ४५ पाहुणे पाचशे मराठी उद्योजकांना त्यांच्या देशात उद्योग संधी देतील – हा आमचा मंत्र आहे.” कार्यक्रमातील सहभागी सर्व MSME उद्योजक, परदेशी मान्यवर व उद्योग विभागातील अधिकारी यांचे मनःपूर्वक आभार, असे देखील ना. डॉ उदय सामंत ह्यांनी म्हटले.