रत्नागिरी, लांजा येथे आयोजित करण्यात आलेला “The Folk आख्यान” हा आगळावेगळा लोककला सादरीकरणाचा सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे परंपरा, कला आणि संस्कृतीचा जिवंत आविष्कार ठरला.
या सांस्कृतिक सोहळ्याला कुडाळ मालवणचे आमदार माननीय निलेशजी राणे साहेब यांनी उपस्थित राहून आमदार. श्री. किरणजी सामंत यांनी गेल्या वर्षभरात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय व लोकाभिमुख विकासकामांबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच लांजा नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. सावली कुरूप व नगरसेवकांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. उदयजी सामंत, लांजा तालुक्यातील माता-भगिनी, शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि असंख्य कलारसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
