रत्नागिरीलोकशाही दिन 4 मार्च रोजी

लोकशाही दिन 4 मार्च रोजी

रत्नागिरी, (जिमाका) :- जिल्हास्तरावर माहे मार्च 2026 चा लोकशाही दिन बुधवार 4 मार्च 2026 रोजी दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात होणार आहे. दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. जिल्हाधिकारी यांच्या 18 फेब्रुवारी 2026 रोजीच्या आदेशान्वये सोमवार 2 मार्च 2026 रोजी जिल्ह्यासाठी स्थानिक सुट्टी जाहिर करण्यात आलेली आहे तसेच 3 मार्च 2026 रोजी धुलिवंदन असल्याने शासकीय सुट्टी आहे. यामुळे यावेळा लोकशाही दिन 4 मार्च 2026 रोजी होणार आहे, असे उपजिल्हाधिकारी सा.प्र. विश्वजीत गाताडे यांनी कळविले आहे.
लोकशाही दिनाकरीता नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने नागरीकांचे समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करू शकतात.

Breaking News

मतदानाकडे पाठ फिरवणाऱ्या सुशिक्षित वर्गावर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे; ‘नोटा’बाबतही नोंदवले महत्त्वाचे निरीक्षण

मतदानाकडे पाठ फिरवणाऱ्या सुशिक्षित वर्गावर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे; 'नोटा'बाबतही...

उत्कृष्ट लघु उद्योजकास जिल्हा पुरस्कार 2024-25 साठी 4 मार्चपूर्वी अर्ज करावेत

रत्नागिरी, (जिमाका):- जिल्ह्यातील स्थायीरित्या लघु उद्योग नोंदणी झालेल्या उद्योग...