पक्षीमित्र संमेलनात घोषणा
पक्ष्यांचा अधिवास वाचविण्यासाठी एकत्र येऊन काम करुया : सुनील लिमये
रत्नागिरी – पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून व जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या सहकायनि आयोजित पक्षीमित्र संमेलनात ग्रेट इंडियन हार्नबित अर्थात महाधनेशची वनपर्यटनासाठी जिल्हा पक्षी म्हणून घोषणा करण्यात आली . वन विभागामार्फत जिल्ह्यात प्रथमच जिल्हास्तरीय पक्षीमित्र संमेलन येथील हॉटेल कोहिनूर येथे आयोजित करण्यात आले .
वन आच्छादन वाचविण्यासाठी कमीत कमी झाडे तुटतील याची काळजी सर्वांनी घेणे आवश्यक आहे . बनांमुळे पक्ष्यांचा अधिवास वाचू शकतो . पक्षी वाचवणे सर्वांचे काम आहे .
पक्ष्यांचा अधिवास वाचविणे ,हा अधिवास पुनर्सचयन करण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून काम करणे गरजेचे आहे, असे आवाहन माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी केले .
पक्षी बीज प्रसारक असतात .निसर्गता झाडे लावण्याची ,वाढवण्याची ,जगवण्याची प्रक्रिया निसर्ग आणि पक्षी करत असतात. देवराई सांभाळणे आपल्या सर्वांचे काम आहे . सध्या सर्वजण म्हणतात झाडे लावली पाहिजेत ,पक्षी वाचविले पाहिजेत ,पक्ष्यांच्या जाती वाचविल्या पाहिजेत ,हे काम केवळ शासकीय विभाग किंवा वन विभाग करु शकत नाही . यासाठी विविध संस्था ,संघटना यांनी एकत्र येऊन काम करणे ,ही आपली सर्वांची जबाबदारी आहे .काही जागा,माळराने ,देवराई ,पाणथळ जिथे खूप पक्षी येतात ,या जागा कागदोपत्री वन म्हणून घोषित नाहीत . अशा जागा शोधाव्यात व त्या वन म्हणून घोषित करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले .
पक्ष्यांचे ,प्राण्यांचे आपल्या आयुष्याशी एक वेगळे नाते आहे. पक्षीमित्र ,संशोधक ,पक्षीप्रेमी ,पक्षी संरक्षक आणि वन विभाग यांनी तळमळीने काम करणे आवश्यक आहे . आजकाल समाजमाध्यम हे खूप मोठे प्रसारमाध्यम आहे . त्याच्याद्वारे याबाबात सर्वांना माहिती देणे आवश्यक आहे .
चव्हाण म्हणाले ,रत्नागिरी जिल्ह्यात पक्षी संमेलनाला सुरुवात झाली,ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. येणा-या काळाळासाठी या संमेलनाचे महत्व अधोरेखित होईल . भारतात 1300 पक्षी आहेत .220 पक्षी स्थलांतरित असतात . कोकणाचा पाठीराखा सह्याद्री आहे . या संमेलनाचा निश्चितच पक्षी अधिवास संवर्धनासाठी फायदा होईल .
गिरीजा देसाई म्हणाल्या ,जिल्हयाला 167 कि.मी. चा विस्तीर्ण समुद्र किनारा लाभला असून सह्याद्रीच्या पर्वत रांगा आहेत .इथे प्राणी व पक्षी यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे .जवळपास 350 पेक्षा जास्त पक्षांच्या जाती आढळतात . जिल्ह्याचे नाव निसर्ग पर्यटन तसेच पक्षी पर्यटन म्हणून जगाच्या नकाशावर आणण्यासाठी पक्षी प्रेमी , पक्षी तज्ज्ञ संशोधक यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे . याबाबत जनजागृती करण्यासाठी या पक्षीमित्र संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे . पुढील संमेलन हे मोठ्या स्वरूपात घेतले जाईल. विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी ,राज्यभरातील पक्षी निरीक्षक ,पक्षी संशोधक,पक्षी अभ्यासक वन विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
