रत्नागिरीवरवडे येथे श्री. निलेश भगवान सांबरे साहेब यांच्या ५० व्या जन्मदिना निमित्त,...

वरवडे येथे श्री. निलेश भगवान सांबरे साहेब यांच्या ५० व्या जन्मदिना निमित्त, आयोजित खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

वरवडे येथे श्री. निलेश भगवान सांबरे साहेब यांच्या ५० व्या जन्मदिना निमित्त, आयोजित खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न–.

📍वरवडे ग्रामपंचायत हॉल, वरवडे, ता. जि. रत्नागिरी येथे
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र राज्य, संस्थापक अध्यक्ष श्री निलेश जी भगवान सांबरे साहेब यांचा येत्या १७ एप्रिल ला, ५० वा जन्मदिन.

▪️त्यांच्या ह्या ५० व्या जन्मदिनाचे औचित्य साधून, रत्नागिरी विभगा तर्फे, राज्य सचिव श्री केदार चव्हाण साहेब, जिल्हाध्यक्ष ऍड. श्री महेन्द्र मांडवकर साहेब, तालुका अध्यक्ष श्री मंदार नैकर साहेब, यांच्या नेतृत्वात गावोगावी , भव्य मोफत आरोग्य शिबीर आणि महिलांसाठी खेळ पैठणीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

▪️ वरवडे गाव, वाटद, खंडाळा केंद्र येथे महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न झाला.

▪️महाराष्ट्र राज्य सचिव श्री. केदार चव्हाण साहेब, आणि *श्री. अमर राऊत * यांच्या शुभहस्ते उद्घाटन समारंभ संपन्न झाला.

▪️या कार्यक्रमाचे नियोजन वाटद, खंडाळा विभाग प्रमुख श्री दीपक सांबरे सर यांनी केले.

▪️व्यासपिठावर श्री. केदार चव्हाण साहेब, श्री. अमर राऊत सर, उपसरपंच श्री. गजानन हेदवकर सर, श्री संतोष बोरकर सर,
वरवडे गावाचे प्रथम मानकरी श्री. संदीप दादा विचारे, श्री. केशव बलेकर, मास्टर CRP सौ. अनुजा ताई सावंत, नारी शक्ती फाउंडेशन च्या संस्थापिका / अध्यक्षा सौ संजना ताई मोहिते, खजिनदार सौ अंतरा ताई मोहिते, रत्नसिंधू न्यूज मिडिया च्या संस्थापिका / संपादिका, वर्षा राजे निंबाळकर आदी उपस्थित होते.

▪️कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री साहील गोरे यांनी केले. उपस्थित महिलांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेत कार्यक्रमाचा आनंद लुटला.

▪️सौ. श्रुतिका अनिरुद्ध डोरलेकर ह्या खेळ पैठणीच्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या, सौ. शमिका समीर गैमर ह्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला

▪️ वरवडे गावामध्ये प्रथमच झालेल्या अश्या कार्यक्रमाचे कौतुक होत आहे आणि त्या बद्दल उपस्थित महिलांनी जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्था आणि संस्थापक / संपादक सन्माननीय श्री निलेश जी सांबरे साहेब यांचे आभार मानले आहेत.

Breaking News

रत्नागिरी-दिवा पॅसेंजर दादरपर्यंत नेण्याची मागणी फेटाळली

भविष्यात कोकण रेल्वेचा मार्ग बदलणार; पश्चिम रेल्वे मार्गावरून सुटणार...

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जिल्ह्याची सलग तिसऱ्या वर्षी १०० टक्के उद्दिष्टपूर्ती

१ हजार १९ नव उद्योजकांची प्रकरणे मंजूररत्नागिरी, (जिमाका):- मुख्यमंत्री...