रत्नागिरीवहाळ येथे कृषिदूतांकडून आधुनिक व शाश्वत शेतीचा संदेश, महाराष्ट्र कृषी दिन‌ उत्साहात...

वहाळ येथे कृषिदूतांकडून आधुनिक व शाश्वत शेतीचा संदेश, महाराष्ट्र कृषी दिन‌ उत्साहात साजरा

वहाळ येथे कृषिदूतांकडून आधुनिक* व शाश्वत शेतीचा संदेश, महाराष्ट्र कृषी दिन‌ उत्साहात साजरा*

ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण(ता. चिपळूण) येथे महाराष्ट्र कृषी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला.
हरितक्रांतीचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हा कार्यक्रम ग्रामपंचायत वहाळ येथे साजरा करण्यात आला.शेतकऱ्यांचा सन्मान, आधुनिक व शाश्वत शेती तंत्रज्ञानाचा प्रसार तसेच शेतीविषयक जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमात कृषीदूतांनी शेतकऱ्यांच्या कष्टांचे महत्त्व समजावून सांगत “मातीशी नातं जपा, निसर्गाशी मैत्री करा आणि शाश्वत शेतीचा मार्ग स्वीकारा.” हा प्रेरणादायी संदेश
दिला. जमिनीची काळजी, पाण्याचा योग्य वापर आणि शाश्वत शेतीचा‌ अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण करून महाराष्ट्र कृषी दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास वहाळ चे सरपंच मा.मंगेशशेलार , तसेच उपसरपंच मा.आनंदा सकपाळ, ग्रमसेवक बजरंग हराळे उपस्थित होते.
हा उपक्रम कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. प्रशांत इंगवले तसेच सर्व विषयतज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.
हा कार्यक्रम पार करण्यासाठी कृषीदूत सार्थक माळी , कृणाल वेळापुरे , सुजय माजगांवकर,तन्मय यादव,साहिल सार्वडेकर,आदर्श आगरे , सतेज बच्चे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...