रत्नागिरीवाहाळ येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

वाहाळ येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

वाहाळ येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
वाहाळ (चिपळूण): जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा क्र. १, वाहाळ येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती संयुक्तपणे अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय (मंडकी-पालवण) येथील कृषीदूत विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्य अनुभव कार्यक्रमांतर्गत (RAWE) या उपक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक गायकवाड सर व मान्यवरांच्या हस्ते दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. या प्रसंगी मुख्याध्यापक गायकवाड सर आणि शेख मॅडम यांनी विद्यार्थ्यांना जयंती व पुण्यतिथी का साजरी केली जाते याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले, तसेच कृषीदूतांनी उपस्थितांना दोन्ही महापुरुषांच्या जीवनकार्याविषयी सखोल माहिती सांगितली.
या सोहळ्यानिमित्त जि. प. प्राथमिक शाळा क्र. १ च्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये शाळकरी मुलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेत महापुरुषांच्या विचारांना उजाळा दिला. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड सर, शेख मॅडम, शिक्षकवृंद, शाळकरी विद्यार्थी आणि कृषी महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गायकवाड सर व उपस्थितांनी कृषीदूतांच्या या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले असून, कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला.

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...