रत्नागिरीविलवडे गावात आमदार किरण सामंत यांचा गावभेट दौरा--

विलवडे गावात आमदार किरण सामंत यांचा गावभेट दौरा–

◾“दुश्मन असो वा मित्र, त्याचे काम झालेच पाहिजे” – आमदार किरण सांमत

लांजा तालुक्यातील विलवडे गावातील ग्रामस्थांशी आमदार किरण सामंत यांनी प्रत्यक्ष संवाद साधला. ग्रामस्थांनी विविध अडचणी, शासकीय योजनांचा लाभ तसेच स्थानिक विकास कामांबाबत प्रश्न आमदारांसमोर मांडले.

👉 यावेळी आमदारांनी सांगितले की,“जनतेच्या प्रश्नांना प्राधान्याने न्याय देण्यासाठी मी तुमच्या दारी आलो आहे. कोणत्याही नागरिकाचा प्रश्न न सोडवता राहणार नाही,” असे आश्वासन त्यांनी दिले.

◾“दुश्मन असो वा मित्र, त्याचे काम झालेच पाहिजे” – आमदार किरण सामंत
लांजा तालुक्यातील गाव भेट दौऱ्यात आमदार किरण सामंत यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.

👉 “माझा दुश्मन जरी असेल तरी त्याचे काम करून द्यावे. जनतेच्या प्रश्नांना आणि कामांना व्यक्तीगत वैर वा राजकीय भेदाभेद आड येता कामा नये. प्रत्येक नागरिकाला शासनाच्या योजनांचा व विकासकामांचा लाभ मिळाला पाहिजे,” असे आमदार सामंत यांनी ठामपणे सांगितले.
त्यांच्या या वक्तव्याचे ग्रामस्थांनी स्वागत केले.
गाव भेटीदरम्यान विविध विषयांचा आढावा
आमदार किरण सामंत यांनी गाव भेटीदरम्यान ग्रामस्थांशी संवाद साधत स्थानिक प्रश्नांची माहिती घेतली.

👉 यावेळी रस्ते, पाणी, वीज, बचत गट, आरोग्य, शिक्षण, सांस्कृतिक उपक्रम, कला आणि क्रीडा क्षेत्र अशा विविध विषयांवर चर्चा झाली. ग्रामस्थांनी आपल्या अडचणी व मागण्या आमदारांसमोर मांडल्या.
आमदारांनी संबंधित विभागाशी समन्वय साधून सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.
यावेळी तालुक्यातील सर्व अधिकारी कर्मचारी पदाधिकारी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Breaking News

साखर गावच्या श्री नवलादेवी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला २२ सप्टेंबरपासून प्रारंभ

राजापूर तालुक्यातील श्री नवलादेवी लक्ष्मीकेशव देवालय ट्रस्ट, साखर तर्फे...

रत्नागिरी शहरातील स्वच्छतादूतांना भाजपा माजी नगरसेवकांकडून साहित्य वाटप–

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता...