संगमेश्वरविवान भांगे बिडीएस परीक्षेत सुयश,कसबा केंद्रात प्रथम व देशात आला तिसावा--

विवान भांगे बिडीएस परीक्षेत सुयश,कसबा केंद्रात प्रथम व देशात आला तिसावा–

संगमेश्वर तालुक्यातील कसबा गावचा रहिवासी असलेला कु.विवान धनाजी भांगे यांने बीडीएस परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.विवान ने या परीक्षेत १०० पैकी ९४ गुण घेत राष्ट्रीय स्तरावर ३० वा क्रमांक पटकावला.या यशामुळे तो सुवर्ण पदकासाठी पात्र ठरला आहे.विवान हा संगमेश्वर येथील न्यू इंग्लिश स्कूल, कसबा या शाळेतील विध्यार्थी आहे.
*विवान लहानपणापासूनच विविध उपक्रमात सहभागी होत असतो .तो वकृत्व स्पर्धा, कथाकथन स्पर्धेत सहभागी होऊन नंबर पटकावत असतो. त्याला नृत्याची आवड असून तो सध्या अबॅकस स्पर्धेत ही ३ ऱ्या क्रमांकावरील राज्यस्तरावरील बक्षीस घेतले आहे. अबॅकस चे क्लास ची विशेष आवड आहे. विवान चे वडील संगमेश्वर येथील लिटिल स्टार प्री स्कूल चे संचालक असून कारभाटले विद्यालय येथे शिक्षक म्हणून ही कार्यरत आहेत.आई लिटील स्टार प्री स्कूल ला मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.

▪️विवान ला अत्तार मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.त्याच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक गुलशन मॅडम, अस्मा मॅडम, रजपूत व इतर शिक्षिका यांनी कौतुक केले आहे.

▪️विवान च्या या यशाबद्दल कसबा पंचक्रोशीतून अभिनंदन करण्यात येत आहे.

Breaking News

Play Through Free Spins Without Wasting Winnings

Play Through Free Spins Without Wasting WinningsPlay Through Free...

Fungerer Churchill-systemet faktisk i Balloon?

Fungerer Churchill-systemet faktisk i Balloon?Churchill-systemet i Balloon ser robust...