रत्नागिरीवेरवली बू. डाफळेवाडीच्या ग्रामस्थांचा आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत...

वेरवली बू. डाफळेवाडीच्या ग्रामस्थांचा आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत दाखल

वेरवली बू. डाफळेवाडीच्या ग्रामस्थांचा आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत दाखल…

जनतेच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही आमदार किरण सामंत यांनी दिला शब्द*
👉वेरवली बूद्रक. डाफळेवाडीच्या ग्रामस्थांचा आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्यात आला. स्थानिक विकासकामे, जनतेच्या समस्या सोडविण्याची कार्यपद्धती आणि सर्वसामान्यांशी कायम असलेला संपर्क यामुळे प्रभावित होत ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश करत आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वावर आपला विश्वास व्यक्त केला.

यावेळी आयोजित कार्यक्रमात ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात शिवसेनेचा भगवा हाती घेत पक्षात प्रवेश केला. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही एकत्रितपणे काम करू, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात बोलताना आमदार किरण सामंत म्हणाले की, “जनतेने माझ्यावर दाखविलेला विश्वास ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात कायम सहभागी राहून विकासाची गंगा प्रत्येक गावापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध आहे.”

तसेच वेरवली बू. डाफळेवाडी परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, वीज, सामाजिक सुविधा आणि इतर विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप सभापती मानसी आंबेकर तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई उपतालुकाप्रमुख सुजित आंबेकर प्रसाद माने, मुन्ना खामकर गणेश लाखन चेतन खंदारे, दिनेश पवार, जिल्हा परिषद सदस्य मनीषा लाखन पंचायत समिती सदस्य साक्षी चव्हाण प्रकाश गुरव अश्विनी गुरव विजय पांचाळ अरविंद डोळस,शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनिता शिगम, सुरेखा सिंघम सुगंधा बोलिये, प्रतिभा बोलिये जयश्री डाफळे वैशाली शिगम सायली शिगम वंदना शिगम राजश्री डाफले, शरद तळेकर दिनेश डाफळे यांच्यासहित अनेक पदाधिकारी ग्रामस्थांनी शिवसेना पक्ष प्रवेश केला.कार्यक्रमात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

Breaking News

Проверенные индивидуалки Москвы: как не ошибиться

Москва — город возможностей. Но поиск реальной анкеты среди...

रत्नागिरीत प्रथमच ‘कलावती साडीज्’चे भव्य प्रदर्शन व विक्री

रत्नागिरीत प्रथमच ‘कलावती साडीज्’चे भव्य प्रदर्शन व विक्री रत्नागिरी :...