रत्नागिरीशकील गवाणकर यांना माहेर समाजरत्न पुरस्काराने सन्मानित-

शकील गवाणकर यांना माहेर समाजरत्न पुरस्काराने सन्मानित-


रत्नागिरी…. रत्नागिरी शहरातील ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते शकील गवाणकर यांना सन 2025 चा माहेर समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
मुख्य कार्यालय पुणे येथे असणारी आणि संपूर्ण महाराष्ट्रात 68 शाखा असलेल्या माहेर या संस्थेच्या वतीने हा सन्मान करण्यात आला.
माहेर संस्थेच्या 28 व्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भारत सरकारचा नारीशक्ती पुरस्कर्त्या लुसी कुरियन यांचे हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. शकील गवाणकर हे गेली 8 वर्षे संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी च्या माध्यमातून अविरत सामाजिक कार्य करीत आहेत,या त्यांच्या कार्याची दखल माहेर संस्थेने घेतली.शकील गवाणकर यांना हा मानाचा समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी च्या परिवारातर्फे आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Breaking News