गुन्हेगारीशहर पोलिसांची दमदार कामगिरी पकडला लाखोचा अंमली पदार्थ

शहर पोलिसांची दमदार कामगिरी पकडला लाखोचा अंमली पदार्थ

रत्नागिरी :
शहरात पेट्रोलिंग करत असता मुरुगवाडा पांढरा समुद्र येथे पोलिसांना सापडला ब्राऊन शुगर आणि गांजा

शहर पोलिसाच्या डी बी पथकाने तात्काळ दोघांना घेतले ताब्यात त्याच्याकडे सुमारे 4 लाख, 43 हजार,
200 रुपये किंमतीचा एकूण माल सापडला.काल
दि.28/10/2024 रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. सतिश शिवरकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे पोउनि/ श्याम आरमाळकर, सपोफौ/दिपक साळवी, पोलीस हवालदार – अमोल भोसले,अरुण चळके,राहुल जाधव,पंकज पडेलकर, अशिष भालेकर, पोलीस नाईक-भालचंद्र मयेकर, पोलीस शिपाई-अमित पालवे व कौस्तुभ जाधव हे शहरातील मुरुगवाडा पांढरा समुद्र येथे पेट्रोलिंग करीत असताना सायंकाळी त्यांना दोन संशयित इसम दिसून आले

त्यांच्या हालचालीवरून पोलिसांना संशय आल्याने त्या दोन जणांना ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी आपले नाव 1) करमजीत सिंह जनरेल सिंह, 2) मोहन सिंह भाट असे सांगितले असता सदर दोन्ही इसमाची पोलीस स्टाफ ने कसुन तपासणी केली तेंव्हा, त्यांचे ताब्यात 182 ग्रॅम ब्राऊन हेरॉईन (कींमत. 4,00,400/- रुपये) व 52.5 ग्रॅम गांजा ( कींमत. 1,050/- रुपये) व इतर साहित्य असे एकूण *4,43,200/- रुपये किंमतीचा माल* मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन रत्नगिरी शहर पोलीस ठाणे येथे NDPS Act.1985 चे कलम 8(क),20(ब)(¡¡)(अ), 22(ब), 29 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Breaking News