रत्नागिरीशालेय वेळेत जिल्हा परिषद , पंचायत समिती तसेच बाहेर फिरणाऱ्या शिक्षकांवर कार्यवाही...

शालेय वेळेत जिल्हा परिषद , पंचायत समिती तसेच बाहेर फिरणाऱ्या शिक्षकांवर कार्यवाही होणार

शालेय वेळेत जिल्हा परिषद , पंचायत समिती तसेच बाहेर फिरणाऱ्या शिक्षकांवर कार्यवाही होणार .
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे कौतुक.
एजाज इब्जी. समाजसेवक मात्र शिक्षक शाळे बाहेर का पडतात? याचा स्थायी समितीने गांभीर्याने विचार केला का?
शाळाबाह्य कामाने शिक्षक झाले बेजार . आदेश मात्र हजार
चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक अत्यंत जबाबदारीने तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी झटणारे असून नुकतेच स्काॅलरशिप परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे यश संपादन केले. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे ट्यूशन क्लासेस नसतात. शिक्षकांच्या अमूल्य मार्गदर्शनावरच राज्यात रत्नागिरी जिल्ह्याचे नावलौकिक केले.
शिक्षकांना जिल्हा परिषद , पंचायत समितीत वारंवार जाण्याची हौस नाही. अनेक शिक्षकांचे कार्यालयीन कामे कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पूर्ण झालेली नसतात. उदा. सेवा पुस्तके अपूर्ण , रजा मंजूरी अपूर्ण , अनेक प्रकारची बिले अपूर्ण या साठीच शिक्षक कार्यालयात जातात. अनेक वेळा संबंधित कर्मचारी कार्यालयात उपलब्धच नसतो. त्यामुळे शिक्षकांना कार्यालयात जावे लागते. शिवाय शिक्षक आपली रितसर रजा भरून किंवा हालचाल रजिस्टर मध्ये नोंद करून जात असतो. शिक्षक जर कार्यालयीन वेळेत कार्यालयात नाही गेला तर जिल्हा परिषद त्यांचे सुट्टीच्या दिवशी प्रश्न सोडविणार काय ?
विद्यार्थ्यांची खरोखरच जिल्हा परिषदेला काळजी असेल तर शिक्षकांना शाळाबाह्य कामे उदा. जणगणना , बीएलओ , उठसूठ होणारे बिनकामाचे सर्वे आदी शिक्षकांच्या मानगुटीवरुन कायमचे काढून टाकावेत. या शाळाबाह्य कामा मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होताना जिल्हा परिषदेच्या अधिकारी पदाधिकाऱ्यांनी दिसत नाही काय?
जिल्ह्यातील शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी जिल्हा परिषदेने या बाबत तातडीने ठराव मांडून कार्यवाही करावी. असे रत्नागिरीतील समाजसेवक एजाज महमूद इब्जी यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा , उपाध्यक्ष , शिक्षण सभापती तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लेखी पत्रव्यवहार करून विनंती केली आहे.

Breaking News

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...

MyStake Casino : Vérification & Sécurité

La confiance est primordiale lorsqu’on joue en ligne. Dans...