रत्नागिरीशाळा 15 जुन पासूनच सुरु होणार.. शिक्षण विभाग

शाळा 15 जुन पासूनच सुरु होणार.. शिक्षण विभाग

शाळा 15 जुन पासूनच सुरु होणार.. शिक्षण विभाग-

👉कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा १५ जून ऐवजी 25 जुन पासून सुरू होतील अशी बातमी मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू आहे. परंतु शिक्षण विभागाने मात्र शाळा 15 जून पासूनच सुरू होतील असे जाहीर केले आहे

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शाळांच्या सुरुवातीबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम होता.नवीन शैक्षणिक वर्ष ऑनलाईन सुरू होणार की ऑफलाईन अशा चर्चांना उधाण आले होते.मात्र आता शालेय शिक्षण विभागाने या सर्व चर्चांना पूर्णविराम देत शाळा प्रत्यक्ष (ऑफलाईन) पद्धतीनेच सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात नेहमीच्या पद्धतीनुसार १५ जूनपासूनच होणार आहे.शाळा ऑनलाईन पद्धतीने भरवण्याचा कोणताही विचार शासनाचा नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे शाळेत उपस्थित राहूनच शिक्षण घ्यावे लागणार आहे.

संपूर्ण राज्यात शाळा नियमित वेळापत्रका नुसार सुरू होणार असल्या तरी,विदर्भातील वाढत्या उष्णतेचा विचार करून तिथे वेळेत बदल करण्यात आला आहे.कालावधी १५ जून ते २९ जून.वेळ विदर्भातील शाळा या काळात सकाळी ७ ते ११:४५ या वेळेत भरतील.३० जूनपासून विदर्भातील शाळाही इतर ठिकाणच्या शाळांप्रमाणेच त्यांच्या नियमित वेळेनुसार सुरू होतील.

शिक्षण विभागाने पालकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, शाळा नियोजित तारखेलाच सुरू होतील, असे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

Breaking News

बाळासाहेब माने यांची माघार धक्कादायक व चिड निर्माण करणारी

बाळासाहेब माने यांची माघार धक्कादायक व चिड निर्माण करणारी.....

बाळ मानेंच्या भाजप प्रवेशाला वरिष्ठांनी दिली मान्यता??

बाळ मानेंच्या भाजप प्रवेशाला वरिष्ठांनी दिली मान्यता?? 👉रत्नागिरी चे...