यावेळी त्यांना शाश्वत कोकण परिषदेच्या कोकणा विषयीच्या धोरणात्मक मागण्यांचा मसुदा देण्यात आला.
निसर्ग संपन्न कोकणात रिफायनरी व अन्य प्रदूषणकारी प्रकल्प प्रस्तावित करू नयेत असे ठामपणे मांडण्यात आले.
कोकणात रोजगार व समृद्धीसाठी शासनकर्ते व नितीकर्ते यांच्या सोबत संवादाची भूमिका राहील असे सांगण्यात आले.
मासेमारांच्या मुद्द्यांविषयीही सविस्तर चर्चा करण्यात आली.
या भेटीत शाश्वत कोकण परिषदेचे निमंत्रक सत्यजीत चव्हाण , अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल , बारसु – सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष( मुंबई) वैभव कोळवणकर व खजिनदार (मुंबई) विनायक शिंदे , सोलगावचे संतोष तीर्लोटकर , नाणार-पाळेकरवाडीचे सत्यवान पाळेकर , पडवेचे सुशील वालम , देवाचे गोठणेचे योगेश चव्हाण व ओझर – राजापूरचे चंद्रकांत कुर्ले उपस्थित हो