शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील झंझावती दौऱ्यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या अधिकाऱ्यांसमवेत लगेचच सोडविल्या गेल्या .त्यांना शिक्षकांचा कार्यसम्राट आमदार का म्हणतात हे सर्वांनाच पाहायला मिळाले. सभेसाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अधिकारी, जिल्ह्यातील सर्व संघटनांचे प्रमुख पदाधिकारी तसेच अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आपल्या समस्या घेऊन माळ नाका येथील गेस्ट हाऊस येथे झालेल्या सभेत उपस्थित होते.सौ. शिरभाते शिक्षणाअधिकारी माध्यमिक ,कासार साहेब शिक्षणाधिकारी प्राथमिक ,प्रीती पवार मॅडम अधीक्षक पे युनिट, श्री.भागवत जिल्हाध्यक्ष संस्था संघटना, श्री.भावे अध्यक्ष भारत शिक्षण मंडळ, संदेश राऊत कोषाध्यक्ष राज्यमुख्याध्यापक महामंडळ,श्री.मुल्ला अध्यक्ष मुख्याध्यापक संघ रत्नागिरी जिल्हा ,श्री.पुजारी मुख्याध्यापक संघ जिल्हा प्रतिनिधी,सागर पाटील अध्यक्ष अध्यापक संघ रत्नागिरी जिल्हा,राजेश जाधव अध्यक्ष शिवछत्रपती शिक्षक संघटना रत्नागिरी जिल्हा,बिजापूरे मॅडम शिवछत्रपती शिक्षक संघटना जिल्हा संघटक महिला, तौसीब शेख शिवछत्रपती शिक्षक संघटना, किरण देशपांडे अध्यक्ष शिक्षक परिषद ,सुनील पाटील मा.अध्यक्ष संगमेश्वर, दिलीप देवळेकर अध्यक्ष अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, राजेश आयरे सचिव रत्नागिरी तालुका शिक्षक परिषद,श्री. केळकर अध्यक्ष शिक्षकेतर संघटना रत्नागिरी तसेच जिल्ह्यातील अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील झंझावती दौऱ्यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या अधिकाऱ्यांसमवेत लगेचच सोडविल्या गेल्या
