महाराष्ट्रशिक्षण पंढरीत मराठी भाषा उद्योगमंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा डॉ उदय सामंत...

शिक्षण पंढरीत मराठी भाषा उद्योगमंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा डॉ उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांसोबत साधला संवाद

शिक्षण पंढरी असलेल्या पुण्यातल्या नौरोसजी वाडिया या नामांकित शिक्षण संस्थेतल्या विद्यार्थ्यांसोबत उद्योगमंत्री डॉ उदय सामंत संवाद साधला. विद्यार्थ्यां सोबतचा संवाद हा नेहमीच ऊर्जा देणारा असतो. यावेळी विद्यार्थी म्हणून सामाजिक जबाबदारीची जाणिव ठेवण्याचं आवाहन विद्यार्थ्यांना केलं.
महाराष्ट्रातही इतर राज्यांप्रमाणे गुणवंत खेळाडू घडले पाहिजेत. असे खेळाडू घडतांना त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे. गुणवंत खेळाडूंना शिक्षणात आणखी सवलती मिळाल्या पाहिजेत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रुजविण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न झाले पाहिजेत. देशभक्तीसोबतच राज्याचा अभिमान असला पाहिजे. त्यासाठी मराठी भाषेचा आग्रह आपण धरायला हवा, असा सल्लाही उद्योगमंत्री डॉ उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना यावेळी दिला.

महाराष्ट्रात अनेक महापुरुष घडले. त्यांची भाषा मराठी होती. याचा अभिमान बाळगून आपण मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच दररोजच्या सर्व व्यवहारांमध्ये मराठी भाषेचा वापर करून एक नवा पायंडा पाडला पाहिजे आणि एक वेगळा आदर्श निर्माण केला पाहिजे, असं आवाहन यावेळी ना.उदय सामंत यांनी केलं.
नौरोसजी वाडिया महाविद्यालय गेल्या ९३ वर्षांपासून अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना घडवत आहे. इथले विद्यार्थी विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. असेच गुणवंत विद्यार्थी घडविण्याची परंपरा अविरतपणे संस्था आजही पुढे नेत आहे…

या कार्यक्रमाला अतिथी म्हणून सरहद संस्थेचे अध्यक्ष श्री. संजय नहार माजी आमदार रवींद्र फाटक यांचीही कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती होती. तसेच मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त डॉ. अशोक चांडक, प्रा. सचिन सानप, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत चाबुकस्वार व इतर मान्यवर उपस्थित होते.

Breaking News