मुंबई साकीनाका विभागातील “शिवनेर मित्र मंडळ संचलित” शिवनेर विद्या मंदिर हायस्कूल मध्ये प्राथमिक विभाग माध्यमिक विभाग इंग्रजी माध्यम जुनिअर कॉलेज यांच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये अनेक विद्यार्थी छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेमध्ये आले होते. तसेच राजमाता जिजाऊ ,मावळे यांची देखील वेशभूषा करण्यात आली होती. शिवनेर विद्या मंदिर पासून साईबाबा मंदिर असल्फा, जंगलेश्वर मंदिर ,खैरानी रोड ते शाळेपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. शिवनेर मित्र मंडळ संचलित शिवनेर विद्या मंदिर हायस्कूलचे संस्थापक, अध्यक्ष सन्माननीय श्री. गजानन डोंगरे बाबा तसेच सचिव सन्माननीय श्री. निवृत्ती डोंगरे बाबा यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले, शिवरायांची आरती करून छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांच्या गजरामध्ये मिरवणुकीला सुरुवात झाली . मिरवणुकीमध्ये संस्थेचे सचिव श्री. निवृत्ती डोंगरे बाबा मराठी माध्यम मुख्याध्यापिका श्रीमती लांडगे मॅडम ,इंग्रजी माध्यम मुख्याध्यापिका दीपा मॅडम ,प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका आशिया मॅडम प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका सौ. जयश्री डोंगरे मॅडम तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी या सर्वांचा समावेश होता. ढोल ताशांचा गजर ,लेझीम ,परेड या मिरवणुकीचे वैशिष्ट्य होते. मिरवणुकीमध्ये विद्यार्थ्यांनी पोवाडे सादर केले. तसेच शिवगर्जना देऊन परिसर दणाणून सोडला.विभागातील विविध संस्थांनी पाणी तसेच अल्पोपहार व्यवस्था केली होती. मिरवणुकीला साकीनाका पोलीस ठाणे यांचे विशेष सहकार्य लाभले .सकाळी ८ वाजता सुरू झालेली भव्य शिवजयंती मिरवणूक११ वाजता शाळेजवळ येऊन थांबली. शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले .छत्रपती शिवाजी महाराज की जय ,जय भवानी जय शिवाजी या घोषणांच्या गजरात कार्यक्रम संपन्न झाला.
© Copyright - Konkan24News. Website Design, Development & Maintain by SM Media. +91 96047 60330.
