रत्नागिरीशिवसेना पक्षाला बळकट करण्यासाठी व शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी राज्यव्यापी 'शिवसंवाद दौऱ्याचे' आयोजन...

शिवसेना पक्षाला बळकट करण्यासाठी व शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी राज्यव्यापी ‘शिवसंवाद दौऱ्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.

शिवसेना पक्षाला बळकट करण्यासाठी व शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी राज्यव्यापी ‘शिवसंवाद दौऱ्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.

👉काल या दौऱ्याला नाशिक येथून सुरुवात झाली. नाशिकमधील हॉटेल एक्स्प्रेस इन येथे इगतपुरी व देवळाली विधानसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींसमवेत आढावा बैठक झाली.

शिवसेना संसदीय गटनेते खासदार.श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीला शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. डॉ उदय सामंत ह्यांनी उपस्थित राहून, आगामी काळातील नियोजनाबाबत, मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत आणि मतदारसंघातील संघटनात्मक मजबुतीकरणावर सविस्तर चर्चा केली.

यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी संवाद साधतांना, सरकारच्या लोककल्याणकारी योजना आणि विकासकामे प्रत्येक घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी थेट जनतेशी संपर्क वाढवावा, ‘संघटनात्मक ताकद वाढवणे, समन्वय राखणे आणि विकासकामांचा धडाका कायम ठेवणे’ या त्रिसूत्रीवर कार्य करत ग्रामीण भागापर्यंत पोहचण्याचे लक्ष्य त्यांना दिले.

या बैठकीला माजी खासदार आनंद परांजपे, राज्याचे मंत्री सर्वश्री दादाजी भुसे, गुलाबरावजी पाटील, आमदार सुहास कांदे, आमदार मनीषा कायंदे, नाशिकचे उपमहापौर विलास शिंदे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, उपनेते अजय गोरस्ते, विजय करंजकर, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, माजी खासदार आनंद परांजपे, उन्मेष पाटील, माजी आमदार नरेंद्र दराडे, काशिनाथ मेंगाळ, जिल्हा संघटक योगेश म्हस्के, युवासेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख अविष्कार भुसे, युवासेना जिल्हाप्रमुख सदानंद नवले यांच्यासह जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, सर्व आघाड्यांचे प्रमुख आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News

Проверенные индивидуалки Москвы: как не ошибиться

Москва — город возможностей. Но поиск реальной анкеты среди...

रत्नागिरीत प्रथमच ‘कलावती साडीज्’चे भव्य प्रदर्शन व विक्री

रत्नागिरीत प्रथमच ‘कलावती साडीज्’चे भव्य प्रदर्शन व विक्री रत्नागिरी :...