महाराष्ट्रशिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या विठुरायाच्या भव्य मूर्तीचे अनावरण तसेच...

शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या विठुरायाच्या भव्य मूर्तीचे अनावरण तसेच हडपसर मतदारसंघातील ९३ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन व उदघाटन सोहळा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते पार पडला

शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या विठुरायाच्या भव्य मूर्तीचे अनावरण तसेच हडपसर मतदारसंघातील ९३ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन व उदघाटन सोहळा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते पार पडला. शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हडपसर मतदारसंघात नागरिकांच्या विविध प्रकारच्या सुख सोयींसाठी पुणे शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला असल्याचे मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाप्रसंगी निघालेल्या दिंडीत मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सहभागी होत वारकऱ्यांसोबत माऊलींच्या भजनाचा आनंद घेतला. त्यावेळी मा. ना. उदयजी सामंत वारकऱ्यांसोबत फुगडीही खेळले. या दिंडीत मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी बालवारकऱ्यांशी संवाद साधला व त्या बालवारकऱ्यांच्या माध्यमातून आपली संस्कृती जपण्याचे काम अतिशय उत्तम पद्धतीने सुरु असल्याबद्दल मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी मंत्रिमंडळातील सहकारी भरतशेठ गोगावले, आमदार चेतन तुपे व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News

ना. उदय सामंत ह्यांच्या उपस्थितीत विद्यार्थी गुणगौरव आणि मार्गदर्शन सोहळा संपन्न

रत्नागिरीच्या मातीत घडणाऱ्या आणि भविष्यात देशाचं नेतृत्व करू पाहणाऱ्या...

महाराष्ट्र भाजप चे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट-

प्रदेशाध्यक्षपदी निवडीनंतर रविंद्र चव्हाण यांची पंतप्रधान मोदींशी झाली पहिलीच...