रत्नागिरीशैक्षणिक सहल उत्साहात संपन्न

शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न

रत्नागिरी : धनजीनाका परिसरातील M.S. Naik English Medium School मध्ये शुक्रवार दिनांक १३/०२/२०२६ रोजी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने या सहलीत सहभाग घेतला.
मुख्य आकर्षण – प्रश्नमंजुषा उपक्रम
विद्यार्थ्यांना चिपळूण येथील D Star Entertainment Waterpark and Resort येथे नेण्यात आले, जिथे त्यांनी प्रश्नमंजुषा खेळत ज्ञान वाढवले आणि निसर्गसौंदर्याचा आनंद घेतला. शिक्षकांनी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्यास विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
खेळ, गाणी व मनोरंजनात्मक उपक्रमांमुळे सहलीचा आनंद द्विगुणित झाला. सर्व विद्यार्थ्यांनी शिस्तबद्धपणे सहभाग घेतला.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आरिफा म्हालदार यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षकांच्या सहकार्याने ही सहल यशस्वीपणे पार पडली. पालकांनी शाळेचे आभार मानले, तर विद्यार्थ्यांसाठी हा अनुभव आनंददायी व संस्मरणीय ठरला.सहलीसाठी तेथील व्यवस्थापनाचे मनःपूर्वक आभार.”

Breaking News

चूना कोळवण तालुका राजापूर येथे विकासाला गती!

चूना कोळवण येथील गुरववाडी रस्ता तसेच पुरातन महाकाली मंदिर...