महाराष्ट्रश्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे...

श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत ह्यांनी रत्नागिरी शहरातील प्राचीन श्रीराम मंदिरात जाऊन मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या दर्शनाचा लाभ घेतला

दरवर्षी रामनवमीच्या शुभमुहूर्तावर मी येथे येऊन दर्शन घेत असतो. प्रभू रामाचा आशीर्वाद माझ्यावर कायम असल्याचे समाधान मला यनिमित्ताने मिळत आहे, असे यावेळी ना. उदय सामंत म्हणाले.

श्रीराम मंदिर समितीच्या वतीने अध्यक्षा सौ.उर्मिलाताई घोसाळकर यांनी उदय सामंत ह्यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित केले. या पवित्र प्रसंगी अनेक पदाधिकारी व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. ना. उदय सामंत ह्यांनी सर्वांना श्रीरामनवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या, सर्वांच्या प्रेमळ स्वागताबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

Breaking News