रत्नागिरी, (जिमाका): ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम शताब्दी वर्षाचे औचित्य साधून जिल्ह्यात आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत जिल्हा शासकीय रुग्णालय, सर्व उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये झालेल्या तपासणीत एकूण २,७४८ नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला.
जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत राबवण्यात आलेल्या या मोहिमेत सर्वसामान्य रुग्णांपासून शालेय विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये जिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांत एकूण २,४५८ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विशेष भर
या उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून ‘आरबीएसके’ (RBSK) पथकामार्फत विशेष मोहीम राबवण्यात आली.
जिल्ह्यातील १५ शाळांची निवड करून प्रत्यक्ष शाळांमध्ये तपासणी करण्यात आली.
यामध्ये २९० बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम शताब्दी निमित्त रत्नागिरीत आरोग्य शिबिरे; २७४८ जणांची तपासणी
