रत्नागिरीश्री देवी भगवती मंदिर, किल्ले या देवस्थानच्या शिमगोत्सावाची रूपरेषा जाहीर..

श्री देवी भगवती मंदिर, किल्ले या देवस्थानच्या शिमगोत्सावाची रूपरेषा जाहीर..

रत्नागिरी– रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री भगवती देवीच्या शिमगोत्सवाची बैठक नुकतीच पार पडली.
या बैठकीला विश्वस्त मंडळ, उत्सव कमिटीचे सदस्य याच बरोबर किल्लेकर, पेठकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिमगोत्सव कार्यक्रम रूपरेषा

देवीचा शिमगोत्सव दिनांक चार मार्च रोजी फाग पंचमीला सुरुवात होईल तर दिनांक 5 मार्च रोजी षष्ठीच्या दिवशी सकाळी 8 वाजता देवीला रूपे चढविण्याचा कार्यक्रम होईल त्यानंतर 11 वाजता निशाण काठी उभी करण्यात येईल. त्यानंतर दुपारी ठीक 2:30 वाजता मंदिरात गाऱ्हाणे घालून देवी गावभेटी साठी निघेल.
दिनांक 13 मार्च रोजी होळी च्या दिवशी श्री भगवती देवी ठीक 2:30 ला वाजतगाजत झाडगाव शेरेनाका येथे श्री पारसमल जसराजजी बोहरा (ओसवाल) यांच्या घरी जाईल आणि तेथून 3 वाजता होळी तोडून ती परत निघेल. यावेळी होळी सायंकाळी 6 वाजता पेठकर यांच्या ताब्यात देण्यात येईल. त्यानंतर पेठकर ती होळी 8 वाजता हनुमान वाडी किल्लेकर यांच्या ताब्यात देतील नंतर हनुमान वाडी 9 वाजता भागेश्वर मंदिर येथे होळी राजवडी यांच्या ताब्यात देतील. त्यानंतर ती होळी मंदिरात किल्ल्यावर दहा वाजता येईल. त्यानंतर 12 वाजता होम होईल.
दिनांक 14 मार्च रोजी धुलीवंदन या दिवशी श्री भगवती देवी मंदिरातून तीन वाजता धुळवडसाठी निघेल.
19 मार्च रोजी रंगपंचमीच्या दिवशी
श्री भगवती देवी सायंकाळी 5 वाजता रंग उडवण्यासाठी बाहेर पडेल आणि रात्री 12 वाजता किल्ल्याच्या तटाभोवती प्रदक्षिणा घालेल. त्यानंतर देवीचा गोंधळ कार्यक्रम होऊन प्रसाद वाटप झाल्यानंतर या शिमगोत्सवाची सांगता होणार आहे. तरी सर्व गावकरी मंडळींनी, भाविकांनी श्री भगवती देवीच्या शिमगोत्सव आवर्जून सहभागी व्हावे आणि दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देवी भगवती पब्लिक ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.सालाबाद प्रमाणे यंदाही हा उत्सव जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येणार असल्याचे ठरवण्यात आले

Breaking News