श्री साईअनिरुद्ध एज्युकेशन संस्था पालीच्या डी.जे.सामंत इंग्लिश मिडियम स्कूल लांजा आणि पाली शाळेचा 10 वीचा निकाल 100 टक्के
रत्नागिरी तालुक्यातील पाली येथील श्री साईअनिरुद्ध एज्युकेशन संस्थेच्या लांजा आणि पाली येथील डी.जे.सामंत इंग्लिश मिडियम स्कूलचा दहावीचा निकाल 100% लागला आहे.
या परिक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांमधून डी.जे.सामंत इंग्लिश मिडियम स्कूल लांजा मधून कु. बासुरी सुधीर पांचाळ हिने 95.60% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तसेच कु. श्रेया संदिप निवळे हिने 84.40% गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. आणि तृतीय क्रमांक जुवेरिया आदम रखांगी हिने 80.80% गुण मिळवून प्राप्त केला आहे. त्याचप्रमाणे डी.जे.सामंत इंग्लिश मिडियम स्कूल पाली हायस्कूलमधून अल्फिया जावेद खान हिने 83.60% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच कु. राकेश अर्जुन परमार याने 82.20% गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे तसेच कु. आयुष उमेश कळंबटे याने 81% गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
संस्थेच्या दोन्ही शाळेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे, लांजा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. चारुदत्त उपाध्ये, पाली विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. नूतन कांबळे यांचे श्री साईअनिरुद्ध एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष श्री. रविंद्र उर्फ अण्णा सामंत तसेच सर्व सदस्य व पदाधिकारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
