संगमेश्वरसंगमेश्वर तालुक्यातील देवरुख इथं नोंदीत बांधकाम कामगारांना राज्याचे उद्योग व मराठी भाषा...

संगमेश्वर तालुक्यातील देवरुख इथं नोंदीत बांधकाम कामगारांना राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत ह्यांच्या हस्ते अत्यावश्यक संच, सुरक्षा संच व गृहोपयोगी साहित्य वाटप करण्यात आलं.

संगमेश्वर तालुक्यातील देवरुख इथं नोंदीत बांधकाम कामगारांना राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत ह्यांच्या हस्ते अत्यावश्यक संच, सुरक्षा संच व गृहोपयोगी साहित्य वाटप करण्यात आलं.

नोंदीत बांधकाम कामगारांना साहित्य वाटपात कुणी गैरप्रकार करत असेल आणि तशी तक्रार आल्यास चौकशी करुन त्याच्यावर पोलीस कारवाई केली जाईल, असा शब्द पालकमंत्री या नात्याने ना. उदय सामंत ह्यांनी यावेळी दिला. रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आहे जिथं सात महिन्यांत १० हजारावरुन ५० हजारांपेक्षा अधिक बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आल्याचं ना. उदय सामंत ह्यांनी आवर्जून यावेळी सांगितलं.

रत्नागिरी जिल्ह्यातल्या सुमारे १ लाख महिला-भगिनींना भविष्यामध्ये कर्करोग होऊ नये म्हणून जिल्हा नियोजन समितीच्या वतीनं मोफत इंजेक्शन देण्याचा उपक्रम पुढील महिन्यापासून सुरु करणार असल्याचंही ना. उदय सामंत ह्यांनी उपस्थितांना सांगितलं. त्याचबरोबर अंमलपदार्थापासून नवीन पिढी दूर राहिली पाहिजे, यासाठी जिल्ह्यातल्या सर्व यंत्रणांनी काम केलं पाहिजे, असं आवाहनही यावेळी मा. उदय सामंत ह्यांनी केलं.

या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, रत्नागिरी जि.प. चे माजी अध्यक्ष रोहन बने, जि.प. चे माजी सभापती बाबू म्हाप, तालुकाप्रमुख प्रमोद पवार, उप तालुका प्रमुख सचिन मांगले, शहर प्रमुख सनी प्रसादे, प्रसाद सावंत, कामगार उपायुक्त संदेश आयरे, देवरुख नगरपंचायत माजी उपनगराध्यक्ष अभिजीतजी शेट्ये, नगरसेवक वैभव पवार , देवरुख नगरपंचायत मुख्याधिकारी श्री. विसपुते, तहसीदार अमृता साबळे यांसह नोंदीत बांधकाम कामगार उपस्थित होते.

Breaking News