संगमेश्वरसंगमेश्वर पोलिसांची जबरदस्त कारवाई. अवैद्यरित्या गुरांची वाहतूक करणारी बोलेरो पिकअप पकडला

संगमेश्वर पोलिसांची जबरदस्त कारवाई. अवैद्यरित्या गुरांची वाहतूक करणारी बोलेरो पिकअप पकडला

संगमेश्वर पोलीस उपअधिक्षक शिवप्रसाद पारवे यांच्या हजेरीत पथकाने केली धडक कारवाई.

संगमेश्वर /एजाज पटेल 

संगमेश्वर -देवरुख मुख्यमार्गांवरील लोवले नवनिर्माण कॉलेज समोर अवैद्यरित्या दाटीवाटीने गुरे भरून वाहतूक करणारी महेंद्र कंपनीची बोलेरो पिकअप गाडी संगमेश्वर पोलिसांनी मोठ्या शीताफिने पकडली. सदर बोलेरो गाडीतून वाहतूक करणारी गुरे ही  कत्तल करण्यासाठी नेली जात होती. गुरांसहित बोलेरो पिकअप गाडी पोलिसांनी जप्त करून गुन्हा दाखल केला आहे. निष्पाप मुक्या जनावरांची कसाईच्या खाटीकखान्यात जाण्यापूर्वी सुटका केल्याने संगमेश्वर पोलिसांचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
या बाबत अधिक वृत्त असे की भागोजी भिरू कोलापटे राहणार लवाला ता. शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर याच्या सांगण्यावरून चिपळूण तालुक्यातील कोळवंडे येथील मधुकर तुकाराम सावर्डेकर याच्याकडून शंकर भागोजी वाघमोडे वय 27 वर्ष राहणार चांदोली आंबा ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर तसेच पांडुरंग कोंडीबा लांबोरे वय वर्ष 32 राहणार कांडबड ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर हे MH08 डब्ल्यू 3491  पांढरा रंगाची महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप गाडी मधून चार बैल आणि एक पाडा अशी पाच गुरे दाटीवाटीने त्या गुरांना वेदना  किंवा वासना होतील अशा प्रकारे आखुड दोरीने मानेला बांधुन व कोंबुन गुरांना  हालचाल करता येणार नाहीत अशी दाटीवाटीने व निर्दयतेने गाडीतील छोटयाशा जागेत बाजवी पेक्षा जास्त गुरे भरून  गाडीचा हौदात हवा येणार नाही   असा चारही बाजुने ताडपत्रीने बंदीस्त करुन तसेच गुरांना दुखापत होवुनये म्हणून मॅटची सुवीधा व गुरांसाठी पार्टीशन न करता, गुरांची वैद्यकीय तपासणी न करता, गुरांना चारा पाणी यांची सोय न करता, गुरे खरेदी विक्रीची पावती नसताना तसेच गुरे वाहतूक करण्याचा कोणताही परवाना नसताना पूर्णपणे अवैद्यरित्या वाहन चालवण्याचा चालकाकडे परवाना नसताना गुरे वाहतूक केले जात असलेल्या बोलेरो पिकअप गाडीला संगमेश्वर पोलिसांनी नवनिर्माण लोवले कॉलेज समोर अडवून ताब्यात घेतली.

 या गाडीत 20,000 किमतीचा एक बैल  16, 000 किमतीचा एक बैल,18, 000किमतीचा एक बैल,17, 000किमतीचा एक बैल,10, 000किमतीचा एक पाडा अशी  एकूण 74,000 रुपये किमतीची गुरे व 3,50,000 रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस उपअधिक्षक शिवप्रसाद पारवे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, पोलीस कॉन्सटेबल विनय मनवळ, पोलीस कॉन्स्टेबल सचिन कामेरकर, पोलीस कॉन्सटेबल सतीश कोलगे, चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल आंब्रे यांनी ही धडक कारवाई केली असून पुढील कारवाई व तपास पोलीस उप अधिक्षक शिवप्रसाद पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Breaking News

भारतीय नौदलाकडून मासेमारी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर…दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश..

रत्नागिरी, (जिमाका):- भारत पाकिस्तान युध्दाच्या पार्श्वभूमीवर नौदल विभाग व...