सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी चिंचघरी (सती) ता. चिपळूण जि. रत्नागिरी शाळेने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची चमक दाखवली आहे. सह्याद्री शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. ही शाळा विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे. स्पर्धेचे युग लक्षात घेऊन स्पर्धेची पूर्वतयारी विद्यालयात अधिकाधिक करून घेतली जाते. सह्याद्री विज्ञान मंच आयोजित ‘सह्याद्री प्रज्ञाशोध स्पर्धेमंध्ये कु. दूर्वांक अविनाश शिंदे व कु. शौर्य दिपक पोटे या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट ज्ञान, तत्परता व आत्मविश्वासाचे प्रदर्शन करत यश संपादन केले. स्पर्धेत विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, मात्र प्राथमिक शाळा खेर्डी चिंचघरी (सती) विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अचूक उत्तरे देत प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले. या विदयार्थ्याना शाळेचे मुख्याध्यापक श्री.अरविंद सकपाळ यांची प्रेरणा व शिक्षिका सौ.मनिषा कांबळी, सौ. अपूर्वा शिंदे,श्रीम.वृषाली राणे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष लोकप्रिय आमदार मा. श्री. शेखरजी निकम साहेब, संस्थेचे सचिव मा. श्री. महेश महाडिक सर, सर्व संचालक मंडळ, पालक, सर्व समित्यांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, मुख्याध्यापक श्री. अरविंद सकपाळ, शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे विद्यालयाचे नाव उज्ज्वल झाले असून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे. विद्यालयाच्या वतीने दोन्ही विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
© Copyright - Konkan24News. Website Design, Development & Maintain by SM Media. +91 96047 60330.
