सती चिंचघरी प्राथमिक विद्यालयात चौथीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न
सहयाद्रि शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी- चिंचघरी (सती) या प्राथमिक विद्यालयात यावर्षी ८०विद्यार्थी इ.४ थी मध्ये शिकत आहेत. सदर विद्यार्थी पुढील शैक्षणिक वर्षात इ. ५ वी ला ही शाळा बदलून जाणार आहेत. या विद्यार्थ्यांना कृतज्ञतापूर्वक निरोप,आशिर्वाद आणि सदिच्छा विद्यालयाच्या सर्व शिक्षकवृंद , खालच्या वर्गाकडून व उपस्थित मान्यवराकडून देण्यात आल्या. शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरविंद सकपाळ , प्रमुख पाहुणे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले विद्यार्थी सुरक्षा व भौतिकसुविधा समितीचे सदस्य चिंचघरी गावचे पोलीस पाटील रोहन आग्रे, तेजस्वीनी भुरण, ज्येष्ठ लिपीका विजया मौजे, तंत्रस्नेही किरण आवले शिशुविहारच्या मुख्याध्यापिका ममता ठसाळे व शाळेचा मुख्यमंत्री साश्रिक ठसाळे यांच्या प्रमुख उपस्थित दिपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी विद्यार्थी समर्थ लाड , शौर्य पोटे , सान्वी दवंडे , अंतरा मोहिते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी महिनाभरात सर्वाधिक पुस्तके वाचणाऱ्या लहान गटात स्वरा मुकुंद पवार , स्वरा सचिन चिले व मोठ्या गटात ईश्वरी सागर सकपाळ , ईश्वरी सचिन चांदिवडे या विद्यार्थ्यांना “वाचकवीर पुरस्कार” देवून गौरविण्यात आले. ज्येष्ठ शिक्षक मनिषा कांबळी, रश्मी राजेशिर्के,संदेश सावंत व वृषाली राणे यांनी शिक्षक मनोगतातून शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक श्री. सकपाळ सर यांनी अभ्यासातील चिकाटी, जिद्द, एकाग्रता याबाबत तसेच वर्तमान काळात आलेली व भविष्यात येणाऱ्या आव्हानांचे सविस्तर विवेचन केले व विद्यार्थ्याना बहुमोल शुभेच्छा दिल्या. यावेळी चौथीच्या प्रत्येक विद्यार्थ्याचा एका आगळ्या वेगळ्या पोषाखात सन्मानपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला . इ.४ थी च्या बॅचकडून शाळेला भेटवस्तू प्रदान करण्यात आली व सर्व वर्गांना खाऊ व आईस्क्रिम दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अपूर्वा शिंदे यांनी केले .कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक अरविंद सकपाळ, शिक्षिका मनिषा कांबळी, रश्मी राजेशिर्के, संदेश सावंत, अपूर्वा शिंदे, विनया नटे, वृषाली राणे, अर्चना देशमुख, ज्योती चाळके, रूपाली खरात, वर्षा सकपाळ, शितल पाटील, स्वरा भुरण व शिक्षकेतर . यांनी विशेष मेहनत घेतली.
