सती चिंचघरी प्राथमिक विद्यालयात चिमुकल्यांची आषाढी वारी – वारकरी संस्कृतीचा जागर
👉सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी चिंचघरी (सती) या प्राथमिक विद्यालयात मुख्याध्यापक श्री. अरविंद सकपाळ यांच्या संकल्पनेतून आनंददायी शनिवार अंतर्गत आषाढी एकादशीनिमित्त चिमुकल्या विद्यार्थ्यांची आषाढी वारी व रिंगण सोहळा उत्साहात संपन्न झाला. शाळेतील सर्व विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत तयार होऊन आले होते. विठ्ठल व रखुमाई यांची विशेष भूमिका केलेले विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. शाळेच्या शिक्षिका सौ. रूपाली खरात यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. शाळेतील शिक्षक वृदांच्या शुभहस्ते विठ्ठल रखुमाईची पूजा करण्यात आली. त्यानंतर “राम कृष्ण हरी” जयघोष करीत शाळेच्या मैदानात वारी काढण्यात आली. त्यानंतर गोल रिंगण करून जयघोष करण्यात आला. विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने यामध्ये सहभाग घेतला. यावेळी विविध अभंग ऐकवले गेले. यानंतर शिक्षिका अर्चना देशमुख यांनी आषाढी वारी निमित्त विशेष माहिती सांगितली. शासनाच्या सूचनेनुसार या वारीतून विद्यार्थ्यांनी नवभारत साक्षरता अभियान याबाबत जनजागृती केली तसेच प्लास्टिक मुक्ती, अन्न भेसळ अशा विविध विषयावर देखील घोषणा देऊन व घोषवाक्य सादर करून जनजागृती केली. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरविंद सकपाळ सर, ज्येष्ठ शिक्षिका मनिषा कांबळी, रश्मी राजेशिर्के, संदेश सावंत, अपूर्वा शिंदे, विनया नटे, वृषाली राणे, अर्चना देशमुख, ज्योती चाळके, रूपाली खरात, वर्षा सकपाळ, शितल पाटील, स्वरा भुरण शिक्षकेतर कर्मचारी विजया मौजे, विनोद उदेग, एकनाथ चाळके, प्रतिभा तांबिटकर यांनी विशेष मेहनत घेतली .
