सब ज्युनिअर तायक्वांडो अजिंक्यपद राज्यस्तरीय स्पर्धेसाठी गणराज क्लब ची बरखा संदेची निवड. रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. विजय शिदें, पोलीस उपनिरीक्षक श्री अभय तेली, सामाजिक कारकर्ते श्री मुन्ना देसाई यांनी शुभेच्छा दिल्या.
तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या अंतर्गत व तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रा सबज्युनिअर अजिंक्यपद राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धा दि.26 ते 28 डिसेंबर रोजी वासुदेव हॉल उद्यमनगर, बिहाइंड आर एस एन हॉटेल मुंबई गोवा हायवे कुडाळ डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग या स्पर्धेसाठी सुमारे ६०० खेळाडू सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेसाठी गणराज क्लबची तायक्वांडो खेळाडू क्योरोगी मधुन कुमारी बरखा सर्फराज संदे ही खेळाडू रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार असून बरखा ला मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक आंतर राष्ट्रीय खेळाडू, एशियन युनियन कोच, राष्ट्रीय पंच , महाराष्ट्र राज्य स्वयंमसिध्दा प्रशिक्षक श्री.प्रशांत मनोज मकवाना व महिला प्रमुख प्रशिक्षक सौ.आराध्या प्रशांत मकवाना यांचे मार्गदर्शन लाभत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गणराज क्लबने नेहमीच राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. बरखाच्या आई व बाबा यांच्या मोलाचा वाटा आहे. बरखा सगळ्या ठिकाणी शुभेच्छा वर्षाव होत आहे. रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. विजय शिदें यांनी बरखाला शुभेच्छा दिल्या,नगरध्याक्ष सौ. शिल्पा ताई सुर्वे, नगरसेवक सौ. पूजा पवार, श्री सौरभ मलुष्टे, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबईचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष व्यंकटेश कररा, उपाध्यक्ष निरज बोरसे, दुलीचंद मेश्राम, प्रवीण बोरसे, सहसचिव सुभाष पाटील, कार्यकारणी सदस्य अजित घार्गे, सतीश खेमस्कर ,जिल्हा सघंटनेचे सचिव लक्ष्मण के, खजिनदार शंशाक घडशी, तसेच गणराज क्लब चे पदाधिकारी अध्यक्ष सौ. पूजा शेट्ये, उपाध्यक्ष साक्षी मयेकर, सचिव रंजना मोडूंळा, सौ. स्नेहा मोरे, श्री परेश मोंडूला, शलाका जावकर, एस.आर.के चे प्रशिक्षक शाहरुख शेख, मिलिंद भागवत पालकवर्ग आदींनी शुभेच्छा दिल्या.
सब ज्युनिअर तायक्वांडो अजिंक्यपद राज्यस्तरीय स्पर्धेसाठी गणराज क्लब ची बरखा संदेची निवड. रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. विजय शिदें, पोलीस उपनिरीक्षक श्री अभय तेली, सामाजिक कारकर्ते श्री मुन्ना देसाई यांनी शुभेच्छा दिल्या.
