रत्नागिरीसमाज बांधीलकीची जाणीव करून देणारा सती चिंचघरी प्राथमिक शाळेचा स्तुत्य उपक्रम -अपंग...

समाज बांधीलकीची जाणीव करून देणारा सती चिंचघरी प्राथमिक शाळेचा स्तुत्य उपक्रम -अपंग मित्र निधी जिद्द शाळेला प्रदान

समाज बांधीलकीची जाणीव करून देणारा सती चिंचघरी प्राथमिक शाळेचा स्तुत्य उपक्रम -अपंग मित्र निधी जिद्द शाळेला प्रदान

सहयाद्रि शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी- चिंचघरी (सती) ता.चिपळूण जि. रत्नागिरी हे विद्यालय शैक्षणिक कार्याबरोबर सामाजिक कार्यातही नेहमी अग्रेसर असते. समाजातील गरजू व दिव्यांग बांधवांना मदत करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यामंध्ये सहानुभूती व सामाजिक जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. शाळेने आवाहन केल्यानुसार विद्यार्थ्यांनी मोठ्या कौशल्याने अपंग मित्र निधी जमा करून नुकताच जिद्द मतिमंद मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री. शिंदे सर यांच्याकडे सुपुर्द केला.
जिद्द मतिमंद मुलांच्या शाळेला या शाळेचे विविध माध्यमातून नेहमीच सहकार्य असते. रक्षाबंधन कार्यक्रम एकत्र साजरा करण्यात आला होता. नुकतेच अपंग मित्र निधी संकलनाबाबत श्री. शिंदे सर यांनी संकल्पना मांडली. यासाठी २०० कार्ड शाळेकडे देण्यात आली होती. सदर कार्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यानी कौशल्याने रू.३७,४११/-इतका निधी जमा केला. सदर रक्कम शाळेचे मुख्याध्यापक अरविंद सकपाळ व शिक्षक वृंद यांच्या हस्ते श्री. शिंदे सर व सोबत प्रातिनिधिक स्वरूपात आलेली त्यांच्या शाळेची मुले यांच्याकडे नुकतीच सुपूर्द करण्यात आली. एका कार्डवर रू. २०० पेक्षा अधिक रक्कम जमा करणा-या विद्यार्थ्यांना जिद्दकडून विशेष प्रमाणपत्र देण्यात आले. सदर कामासाठी विद्यार्थ्यासोबत पालकांचेही सहकार्य मोठया प्रमाणात लाभले. शाळेचे मुख्याध्यापक अरविंद सकपाळ, शिक्षिका मनिषा कांबळी, रश्मी राजेशिर्के, संदेश सावंत, अपूर्वा शिंदे, विनया नटे, वृषाली राणे, अर्चना देशमुख, ज्योती चाळके ,रूपाली खरात, वर्षा सकपाळ, शितल पाटील, स्वरा भुरण तसेच शिक्षकेतर कर्मचारी विनोद उदेग, एकनाथ चाळके, प्रतिभा तांबिटकर यांनी या कार्यासाठी विशेष मेहनत घेतली.

Breaking News