रत्नागिरीसमुद्रात बुडणाऱ्या १६ तरुणांचे प्राण वाचविण्यास रत्नागिरी पोलीस दलाला आले यश"

समुद्रात बुडणाऱ्या १६ तरुणांचे प्राण वाचविण्यास रत्नागिरी पोलीस दलाला आले यश”

रत्नागिरी : पूर्णगड पोलीस ठाणे हद्दीमधील पावस व रनपार या गावातील एकूण १६ तरूण हे मौजमजा करण्यासाठी फिनोलेक्स जेटी जवळ “सरस्वती” नामक एका बोटीने समुद्रात फिरण्यासाठी गेले होते.

परंतु समुद्र खवळलेला असल्याने ह्या १६ तरुणांना घेऊन जाणाऱ्या सरस्वती बोटी मध्ये बिघाड निर्माण झाल्याने बोट पलटी झाली व सर्व तरुण पाण्यात ओढले गेले.जवळच असणाऱ्या दुसऱ्या एका “अल फरदिन” या बोटीवरील तांडेल श्री. फरीद ताजुद्दीन तांडेल यांनी तसेच रत्नागिटी पोलीस दलाचे सुरु असलेले “सागर कवच” अभियान दरम्यान बंदोबस्त कामी सिल्वर सन या पायलट बोटीवर तैनात पोलीस अंमलदार HC/मुजावर, MSF चे जवान विजय वाघने व अपूर्व जाधव यांच्या द्वारे या सर्वांना तात्काळ मदत देण्यात आली व बुडत असलेल्या १६ तरूणांना वाचवण्यात मदत करण्यात आलेली आहे.

यासर्व १६ तरुणांना समुद्राच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढून पोलीस स्थानकात आणण्यात आले व त्यानंतर सर्व जणांवर प्रथमोपचार करून त्यांच्या पालकांच्या व नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे तसेच सरस्वती बोट ही पाण्यात बुडलेली आहे.

या घटनेचा अधिक तपास पूर्णगड पोलीस करीत आहेत.

Breaking News

जिल्हास्तरीय लोकशाही दिन’राईट टू एज्युकेशन’ प्रवेश प्रक्रियेबाबत सीईओनी चौकशी करावी- जिल्हाधिकारी मनुज जिंदल

जिल्हास्तरीय लोकशाही दिन'राईट टू एज्युकेशन' प्रवेश प्रक्रियेबाबत सीईओनी चौकशी...

निवळीमध्ये दहीहंडी उत्सवाचा जल्लोष; सात थरांवर दहीहंडी फोडत राजापुरातील जय हनुमान पथकाचा डंका

निवळीमध्ये दहीहंडी उत्सवाचा जल्लोष; सात थरांवर दहीहंडी फोडत राजापुरातील...