Uncategorizedसहयाद्रि आय.टी.आय.मध्ये स्व.गोविंदरावजी निकम साहेब जयंती महोत्सव व प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सावी...

सहयाद्रि आय.टी.आय.मध्ये स्व.गोविंदरावजी निकम साहेब जयंती महोत्सव व प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सावी वर्षानिमित्त् ‘ भारतीय संविधान हक्क आणि कर्तव्ये ‘ या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न…..

सहयाद्रि शिक्षण संस्था,औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावर्डे मध्ये सहयाद्रि शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहषी स्व.गोविंदरावजी निकम साहेब जयंती महोत्स्व व प्रजासत्ताक दिन अमृत महोत्स्वी वर्षानिमित्त् आय.टी.आय.च्या प्रशिक्षणार्थ्याना ‘ भारतीय संविधान हक्क आणि कर्तव्ये ‘ या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भा. अ.तथा भाईसाहेब सावंत अध्यापक महाविद्यालय सावर्डेचे प्राचार्य श्री. रतन कांबळे व सामाजिक कार्यकर्ते श्री. विलास डिके व आय.टी.आयचे प्राचार्य श्री.उमेश लकेश्री यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व स्व.गोविंदरावजी निकम साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रास्ताविक आय.टी.आयचे निदेशक श्री. गोरिवले सुभाष यांनी केले. त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला आय.टी.आय. प्रशिक्षणार्थ्यांच्या दृष्टीने या संविधान जागृतीच्या कार्यक्रमाचे महत्त्व किती आहे हे सांगितले , त्यानंतर आय.टी.आय.मध्ये घेण्यात आलेल्या कॉलेज अंतर्गत क्रिडा स्पर्धांचे बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .तसेच जिल्हास्तरीय तांत्रिक मॉडेल प्रदर्शनामध्ये सर्वोत्कृष्ट निवड झालेल्या डिझेल मॅकेनिक ट्रेडच्या प्रशिक्षणार्थ्यांचा व निदेशकांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्राचार्य श्री. रतन कांबळे यांनी भारतीय संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितली तसेच भारतीय संविधान देशाचा महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे .आज गेल्या 75 वर्षापासून भारतीय संविधानाच्या आधारे भारत विकासाचे एक एक पाऊल पुढे टाकत असल्याचे नमूद केले. संविधानाची उद्देशिका हा संपूर्ण संविधानाचा गाभा आहे.आपले भारतीय संविधान स्वातंत्र ,समता, बंधूता, न्याय,यावर उभे असून संपूर्ण देश एकसंध पणे राहत असल्याचे सांगितले.
भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीयाला मुलभूत हक्क दिलेले आहेत त्यांचे महत्त्व त्यांनी विषद केले. या अधिकारांचा वापर प्रत्येक भारतीयाने केला पाहिजे त्याच्या बरोबर भारतीय नागरिकांनी कर्तव्ये, जबाबदारी ही आपण व्यवस्थित पार पाडली पाहिजे,परंतू समाजामध्ये धार्मिकतेचा अतिरेक , भाषिक प्रांतवार, व्यक्तीपूजा अशा अनेक घटना या भारतीय संविधानाला अडथळा ठरत आहेत. यासाठी समाजात संविधान जागृतीची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आय.टी.आयचे प्राचार्य श्री.उमेश लकेश्री यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून संविधानमंच निर्माण करण्याविषयाचा विचार मांडला. कॉलेजमध्ये अशा प्रकारचे संविधान जागृतीचे विविध उपक्रम राबण्याचा संकल्प व्यक्त केला आज युवकांनी संविधान वाचण्याची गरज आहे असे त्यांनी प्रतिपादन केली. संविधान जागृतीसाठी आय.टी.आय. कॉलेज तत्पर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले व मतदार जागृतीसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली.राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमासाठी आय.टी.आय. चे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तेर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन निदेशक श्री. सुभाष गोरिवले यांनी केले.

Breaking News