रत्नागिरीसह्याद्री कॉम्पिटिटिव्ह अकॅडमीच्या स्पर्धा परीक्षेत प्राथमिक शाळा खेर्डी चिंचघरी सतीच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय...

सह्याद्री कॉम्पिटिटिव्ह अकॅडमीच्या स्पर्धा परीक्षेत प्राथमिक शाळा खेर्डी चिंचघरी सतीच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

सह्याद्री कॉम्पिटिटिव्ह अकॅडमीच्या स्पर्धा परीक्षेत प्राथमिक शाळा खेर्डी चिंचघरी सतीच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी चिंचघरी (सती ) या विद्यालयात शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरविंद सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षांची तयारी विशेषत्वाने करून घेतली जाते. यासाठी सुरुवातीपासूनच विशेष नियोजन केले जाते. सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय आमदार शेखरजी निकम साहेब यांच्या संकल्पनेतून व सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. अनिरुद्ध निकम सर यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री कॉम्पिटिटिव्ह अकॅडमी मार्फत घेण्यात आलेल्या सह्याद्री स्पर्धा परीक्षा 2026 या परीक्षेमंध्ये विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इ .४ थी मधील दुर्वांक अविनाश शिंदे हा संस्थास्तरावर तृतीय क्रमांकाचा व शाळा स्तरावर प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. शाळा स्तरावर अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट क्रमांक मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली असून, यामुळे विद्यालयाचा मान उंचावला आहे. यामध्ये इ ४थी मधून साश्रिक नितीन ठसाळे ,शौर्य दीपक पोटे ,हर्ष अरविंद मोडक, वीर धोंडीराम कांबळे, मयुरेश सूर्यकांत पारवे ,आरोही संदीप निर्मळ , नमितअनिल कनावजे ,मंथन सचिन देसाई , रुद्र रामचंद्र खरात तर इयत्ता तिसरी मधून संस्था स्तरावर तिसरा व शाळास्तरावर अमन स्वप्निल कांबळे प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे तसेच संस्था स्तरावर पाचवा व शाळा स्तरावर दुसरा क्रमांक आयुष भारत मोरे यांनी पटकावला आहे. याचप्रमाणे तुषार खालकर, सुयश संतोष सोलकर , शिवन्या निलेश पवार , रिवांश विनायक वरुडे, जुई रवींद्र पवार ,शरण्या सुरेंद्र बैकर ,रेहांश नरेश चाळके व आराध्या संतोष शिगवण या विद्यार्थ्यांनी क्रमांक मिळवले आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्पर्धा परीक्षांचा भक्कम पाया रचण्याचे कार्य या परीक्षेच्या माध्यमातून प्रभावीपणे सुरूआहे.
विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणासोबत स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करता यावी यासाठी सह्याद्री कॉम्पिटिटिव्ह अकॅडमी च्या माध्यमातून सह्याद्री शिक्षण संस्था प्रयत्न करत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून त्यांना पुढील स्पर्धा परीक्षांमध्ये अधिक यश मिळवण्यासाठी प्रेरणा मिळत आहे. या यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ पालक शाळेच्या मार्गदर्शक समित्यांचे सर्व पदाधिकारी यांनी विशेष अभिनंदन व कौतुक केले असून अशाच प्रकारे यशाची परंपरा अबाधित ठेवा अशा शुभेच्छा दिल्या. या परीक्षेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री अरविंद सकपाळ सर ,शिक्षिका मनिषा कांबळी ,रश्मी राजेशिर्के, संदेश सावंत ,अपूर्वा शिंदे ,वृषाली राणे,अर्चना देशमुख ,ज्योती चाळके ,रूपाली खरात ,वर्षा सकपाळ ,शितल पाटील स्वरा भुरण यांनी विशेष मेहनत घेतली .

Breaking News