चिपळूणसह्याद्री शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (पॉली), सावर्डे या महाविद्यालयास एनबीए मानांकन

सह्याद्री शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (पॉली), सावर्डे या महाविद्यालयास एनबीए मानांकन

नॅशनल बोर्ड ऑफ अँक्रिडिटेशन न्यू दिल्लीकडून सावर्डे (ता. चिपळूण) येथील सह्याद्री शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (पॉली), महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ते २०२७-२८ या तीन वर्षासाठी एनबीए मानांकन प्राप्त झाले.
महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्ता, प्लेसमेंट आणि विध्यार्थ्यांना महाविद्यालया कडून देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा आदी गोष्टीवर आधारित हे मानांकन प्राप्त झाले आहे. यामुळे सह्याद्री शिक्षण संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. एनबीए मानांकन प्राप्त करणारे कोंकण विभागातील हे पहिलेच डिप्लोमा फार्मसी कॉलेज ठरले आहे.
मानांकनाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष आ. श्री. शेखरजी निकम, संस्थेचे सचिव श्री. महेश महाडिक, कॉलेज कमीटी चेअरमन सौ. पुजाताई निकम यांसकडून महाविद्यालयाचे प्राचार्य व सर्व कर्मचारी यांचे अभिनंदन केले. या मानांकनासाठी कॉलेज ची माजी विद्यार्थिनी, माजी कर्मचारी आणि श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी, घोगाव च्या प्राचार्य डॉ. वैशाली पाटील (महाडिक) आणि रत्नागिरी शासकिय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्रा. श्रीकृष्ण मस्के यांचे मार्गदर्शन लाभले.

Breaking News