इंडियन नेव्ही तर्फे आयोजित प्रतिष्ठित OSD – Overseas Deployment या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ऑपरेशनल एक्सरसाईज शिबिरासाठी CC मयुराज टक्के यांची निवड झाली आहे.
या आंतरराष्ट्रीय कॅम्पसाठी केनिया, साऊथ आफ्रिका, मोझाम्बिक आणि टांझानिया या देशांमध्ये भारतीय नौदलाच्या सहभागाने विविध नौदल सराव, प्रशिक्षण आणि सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम पार पडत आहेत.
देशभरातील सर्वोत्कृष्ट NCC कॅडेट्समधून निवड होऊन CC मयुराज टक्के महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत, ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.
साऊथ आफ्रिकेत होणाऱ्या इंडियन नेव्ही च्या आंतरराष्ट्रीय शिबिरासाठी देशातील सर्वोत्कृष्ट कॅडेट म्हणून देवरूखचा मयुराज टक्के याची निवड
