रत्नागिरीसाखर नवलादेवी मंदिरात दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी रंगणार डबलबारी 20 20...

साखर नवलादेवी मंदिरात दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी रंगणार डबलबारी 20 20 भजनाचा जंगी सामनाशेरास सव्वाशेर बतवणीची जुगलबंदी

चव्हाणवाडी(श्री मनोहर धुरी) राजापूर तालुक्यातील साखर नवलादेवी मंदिरात नवरात्रोत्सव निमित्ताने दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजता सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील भजनाची शान बुवा श्री संदीप पुजारे व बुवा श्री अखिलेश फालके यांच्यात भजनाचा 20 20 सामना रंगणार आहे दोन्ही बुवा बतवणीचे माहीर आहेत आज त्यांनी आपल्या बतवणीच्या शैलीने एकमेकांना ठसका देताना भजन रसिकांचे मनोरंजन सुद्धा करत आहेत भ म्हणजे भजावा ज म्हणजे जपावा न नमावा भजनरुपी नामरस जनमानसात कसे निर्माण होईल यासाठी हे दोन्ही बुवा आपल्या भजनातून प्रयन्त करत आहेत भजन रसिक सुद्धा तापवा पेटवा उडव खडलाव अश्या विविध शब्दांचा वापर करून आपलं मनोरंजन करताना या बुवांना प्रतिसाद देत आहेत पखवाज रुपी नाद पेटीचा सूर आणि बुवांचा तालरूपी नाम गजर विविधी गाणी यात ही बारी रंगणार आहे बतावणी विनोद आणि विविध शेलक्या होणार असून तसेच विठ्ठल नाम व हरीचा गजर हे होणारच मात्र सर्वना गजराचा धमाका अभंगाचा गाभा गौळणीचा ठसका आणि विविध गाण्यांची मैफिल होणार आहे या डबल बारी भजनात कानसेन तृप्त होणार हे मात्र नक्कीच तरी परिसरातील भजन रसिकांनी या डबल बारी भजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे

Breaking News

साखर गावच्या श्री नवलादेवी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला २२ सप्टेंबरपासून प्रारंभ

राजापूर तालुक्यातील श्री नवलादेवी लक्ष्मीकेशव देवालय ट्रस्ट, साखर तर्फे...

रत्नागिरी शहरातील स्वच्छतादूतांना भाजपा माजी नगरसेवकांकडून साहित्य वाटप–

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता...