रत्नागिरीसावर्डे विद्यालयाचा नाविन्यपूर्व उपक्रमशालेय ग्रंथालयात ई-लायब्ररी व ऑडिओ लायब्ररीची ओळख

सावर्डे विद्यालयाचा नाविन्यपूर्व उपक्रमशालेय ग्रंथालयात ई-लायब्ररी व ऑडिओ लायब्ररीची ओळख

सावर्डे-विद्यार्थ्यांच्या वाचनसवयी विकसित व्हाव्यात तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, या उद्देशाने सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे येथील ग्रंथालयामध्ये ई-लायब्ररी व ऑडिओ लायब्ररीची ओळख करून देण्यात आली. या उपक्रमाचे आयोजन शाळेच्या ग्रंथालय विभागामार्फत करण्यात आले होते.
या उपक्रमांत विद्यार्थ्यांना डिजिटल पुस्तके, धडे, संदर्भ साहित्य तसेच कथा–कविता ऐकण्याची सुविधा कशी वापरायची, याची सविस्तर माहिती देण्यात आली. शिक्षकांनी ई-लायब्ररी व ऑडिओ लायब्ररीचे शैक्षणिक फायदे समजावून सांगत आधुनिक शिक्षणप्रक्रियेत त्यांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष वापर करून या सुविधांचा अनुभव घेतला व मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
वाचनाची गोडी निर्माण होऊन अभ्यास अधिक सोपा व रंजक होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. वाचन कौशल्याच्या विकासासाठी आयोजित केलेल्या या उपक्रमाचे शाळेचे प्राचार्य राजेंद्र वारे व उपप्राचार्य विजय चव्हाण यांनी विशेष कौतुक केले.
या उपक्रमासाठी शाळेच्या ग्रंथपाल अनुष्का काजळकर यांनी सातत्याने व सचोटीने केलेल्या प्रयत्नांचेही मान्यवरांनी कौतुक केले. कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
इ लायब्ररी चा वापर कसा करावा याविषयी माहिती देताना अनुष्का काजरोळकर

Breaking News