रत्नागिरीसावर्डे विद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात“खेळातून नेतृत्वगुण जोपासा” – प्राचार्य राजेंद्र वारे

सावर्डे विद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात“खेळातून नेतृत्वगुण जोपासा” – प्राचार्य राजेंद्र वारे

सावर्डे – सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात सुरू झाला. विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व अधोरेखित करताना प्राचार्य वारे म्हणाले, “खेळ मानवास तंदुरुस्त, शिस्तबद्ध आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनवतात. नेतृत्वगुण, समयसूचकता आणि यश-अपयशाचा स्वीकार करण्याची किमया खेळातूनच विकसित होते. स्पर्धा कितीही तीव्र असली तरी प्रतिस्पर्ध्याचा आदर करा, हीच खरी क्रीडा मूल्ये आहेत.”

उद्घाटन प्रसंगी उपप्राचार्य विजय चव्हाण सर्व शिक्षकवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रीडा शिक्षक दादासाहेब पांढरे रोहित गमरे आणि अमृत कडगावे यांनी विविध खेळांचे महत्व विद्यार्थ्यांना सांगत क्रीडामनोबल वाढवले.

उप प्राचार्य विजय चव्हाण यांच्या शुभहस्ते ज्योत प्रज्वलनानंतर मैदानावर विद्यार्थ्यांनी क्रीडा नियमांचे पालन व प्रामाणिक खेळाची शपथ घेतली. वार्षिक क्रीडा महोत्सव विद्यार्थ्यांच्या अंगभूत क्रीडागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी आयोजित केला जात असून, यंदाही मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

क्रीडा प्रकारांचे वैशिष्ट्यपूर्ण आयोजन

क्रीडा महोत्सवात मुला–मुलींसाठी विविध सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारांचे आकर्षक आयोजन करण्यात आले.
सांघिक स्पर्धा
कबड्डी,खो-खो,व्हॉलीबॉल,४×१०० मीटर रिले
वैयक्तिक स्पर्धा
भालाफेक,थाळीफेक,गोळाफेक,100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर धावणे
600 मीटर व 800 मीटर धावणे,1500 मीटर धावणे
या सर्व स्पर्धांचे नियोजन क्रीडा शिक्षक दादासाहेब पांढरे, रोहित गमरे आणि अमृत कडगाव यांच्या मार्गदर्शनाखाली २५ व २६ डिसेंबर रोजी करण्यात आले.
कार्यक्रमाची सांगता
कार्यक्रमाच्या शेवटी सहाय्यक शिक्षक अशोक शितोळे यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षकवर्ग, क्रीडा विभाग तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे आभार मानले.
क्रीडाज्योत प्रज्वलन, संचलन आणि प्रभावी नियोजनामुळे क्रीडा महोत्सवाला भव्य स्वरूप प्राप्त झाले. विद्यालय परिसरात दोन दिवस क्रीडास्पर्धांची उत्सुकता आणि स्पर्धात्मक वातावरणाची रंगत अनुभवास आली.

Breaking News