रत्नागिरीसावर्डे विद्यालयाचे SQAAF तालुकास्तरीय परीक्षण यशस्वीरीत्या संपन्न

सावर्डे विद्यालयाचे SQAAF तालुकास्तरीय परीक्षण यशस्वीरीत्या संपन्न

सावर्डे – राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत महाराष्ट्र शासनाचे वतीने राबविण्यात येणाऱ्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन व अधिस्वीकृती आराखडा (स्कॉफ) या उपक्रमाचे तालुकास्तरीय परीक्षण सावर्डे विद्यालयात उत्साहात व यशस्वीपणे पार पडले. शाळेच्या सर्वांगीण गुणवत्तेचे सात परिमाणांवर आधारित मूल्यमापन करून शैक्षणिक उन्नयन साध्य करण्याचा उद्देश या उपक्रमाचा असल्याचे परीक्षण समितीने स्पष्ट केले.

या परीक्षणादरम्यान स्कॉफ चे सात प्रमुख घटक—दृष्टी व नेतृत्व, विद्यार्थी शिक्षण फलिते, अभ्यासक्रम-अध्यापन, विद्यार्थी कल्याण, शिक्षक प्रशिक्षण, पायाभूत सुविधा आणि शाळा व्यवस्थापन व समुदाय सहभाग—यांचे सविस्तर अवलोकन करण्यात आले. स्व-मूल्यमापन, पुरावे सादर करणे, बाह्य मूल्यांकन व उन्नयन आराखडा तयार करण्याची शाळेची प्रक्रिया योग्य दिशेने राबवली जात असल्याचे समितीने समाधान व्यक्त केले.

तालुकास्तरीय समितीचे प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी राजअहमद देसाई, मुख्याध्यापक उदयराज कळंबे (कोसबी हायस्कूल), केंद्रप्रमुख मनोज घाग (कुटरे), तसेच मुख्याध्यापक अवघडे (कोसबी शाळा) यांनी शाळेने सादर केलेल्या अद्ययावत पुराव्यांचे कौतुक केले. प्राचार्य राजेंद्र वारे व उपप्राचार्य विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्कॉफ उपक्रमासाठी करण्यात आलेले कार्य “उल्लेखनीय” असल्याची प्रशंसा समितीकडून करण्यात आली.

Breaking News

जिल्हा परिषद आदर्श शाळा पुरस्कार जाहीर

रत्नागिरी,  (जिमाका) :- ग्रामीण भागातील शाळांना आदर्श शाळा पुरस्कार...