रत्नागिरीसावर्डे विद्यालयात चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादविद्यार्थ्यांच्या कलेचा बहारदार आविष्कार, नशा मुक्त भारत...

सावर्डे विद्यालयात चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादविद्यार्थ्यांच्या कलेचा बहारदार आविष्कार, नशा मुक्त भारत अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सावर्डे – गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे विद्यार्थ्यांची कला, कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध रंगछटा, रेषांचे सौंदर्य आणि कल्पनाशक्तीचा सुंदर संगम विद्यार्थ्यांच्या चित्रांमधून अनुभवायला मिळाला.

स्पर्धेचे उद्घाटन विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्रकुमार वारे यांच्या हस्ते करण्यात आले. चित्रकला ही मुलांच्या अंतर्गत भावनांना अभिव्यक्त करणारी महत्त्वाची कला असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना कलाक्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले.

इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला. निसर्गचित्रे, राष्ट्रीय प्रतीक, स्वच्छ भारत, पर्यावरण संवर्धन, सण-उत्सव, विज्ञान-तंत्रज्ञान, व्यसनमुक्ती अशा विविध विषयांवरील आकर्षक चित्रांनी स्पर्धा रंगतदार झाली. विद्यार्थ्यांच्या मध्ये चित्राद्वारे जागृती होण्यास मदत झाली.

विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे मूल्यांकन करून विजेत्यांची पुढील प्रमाणे घोषणा करण्यात आली—

प्रथम क्रमांक – शुभ्रा विनोद आंबेकर

द्वितीय क्रमांक – श्रीराम अशोक पवार

तृतीय क्रमांक – अर्पिता कृष्णात पाटील व जान्हवी अनिल राजेशीर्के

या स्पर्धेचे यशस्वी आयोजन सिद्धी सावंत यांनी केले. शिक्षकवर्ग, पालक आणि विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे स्पर्धा अत्यंत यशस्वीपणे पार पडल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना देणारा हा उपक्रम भविष्यातील कलाकार घडविण्यास निश्चितच हातभार लावणारा ठरेल, असेही त्यांनी नमूद केले

Breaking News