रत्नागिरीसावर्डे विद्यालयात जागतिक साक्षरता दिन उत्साहात करण्यात आला साजरा--

सावर्डे विद्यालयात जागतिक साक्षरता दिन उत्साहात करण्यात आला साजरा–

जनजागृतीसाठी प्रभात फेरीचे आयोजन

सावर्डे – “शिक्षण जीवन घडवते, आपल्या हक्क व कर्तव्यांची जाणीव करून देते आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिक सुशिक्षित होणे ही काळाची गरज आहे”, असे प्रतिपादन गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे यांनी जागतिक साक्षरता दिनानिमित्त केले.

सह्याद्री शिक्षण संस्था संचलित या विद्यालयात विविध उपक्रमांच्या माध्यमातून साक्षरता दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थी मनोगतात ओवी पाकळे, अवनीश काकडे, वसुंधरा पाटील व आरुष जाधव यांनी साक्षरतेचे महत्त्व प्रभावीपणे मांडले.

शिक्षक मंगेश दाते यांनी साक्षरता दिनाची पार्श्वभूमी व गरज स्पष्ट केली तसेच विद्यार्थ्यांना “शंभर टक्के साक्षर भारत” घडविण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ शिक्षिका शिल्पा राजेशिर्के यांनी विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील निरक्षरांना मदत करण्याची सूचना केली.

या प्रसंगी तयार केलेल्या भित्तिपत्रिकेचे उद्घाटन ज्येष्ठ शिक्षक अशोक शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवीची विद्यार्थिनी धनश्री गायकवाड हिने केले, तर आभार प्रदर्शन शिक्षक अमित साळवी यांनी मानले.

साक्षरतेबाबत जनजागृतीसाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक मंगेश दाते, समृद्धी साळुंखे व सुधीर कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला विद्यालयाचे उपप्राचार्य विजय चव्हाण सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या आयोजनाचे परिसरातील नागरिकांच्या कडून कौतुक केले जात आहे.

Breaking News

साखर गावच्या श्री नवलादेवी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला २२ सप्टेंबरपासून प्रारंभ

राजापूर तालुक्यातील श्री नवलादेवी लक्ष्मीकेशव देवालय ट्रस्ट, साखर तर्फे...

रत्नागिरी शहरातील स्वच्छतादूतांना भाजपा माजी नगरसेवकांकडून साहित्य वाटप–

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता...