रत्नागिरीसावर्डे विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व ग्रंथ प्रदर्शन

सावर्डे विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व ग्रंथ प्रदर्शन

सावर्डे – सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेबांना अभिवादन करून झाली. विद्यार्थी मनोगत युवराज रसाळ व सहकारी यांनी त्यांच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त केले.

सहाय्यक शिक्षक रोहित गमरे यांनी बाबासाहेबांच्या अभ्यासू वृत्ती व ध्येयनिश्चितीचा आदर्श विद्यार्थ्यांनी आत्मसात करावा असे आवाहन केले. उपप्राचार्य विजय चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा डिके यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित भित्तिपत्रकाचे उद्घाटन प्राचार्य राजेंद्र वारे यांच्या हस्ते झाले.

याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कार जोपासण्यासाठी विद्यालयात ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले. कथा, कादंबरी, नाटक, विज्ञान, इतिहास आदी विषयांवरील पुस्तकांची आकर्षक मांडणी करण्यात आली होती. इयत्ता ५ वी ते १० वीतील सर्व विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन विविध पुस्तकांची माहिती घेतली. एकूण बाराशे विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. शिक्षकांनीही प्रदर्शनाला भेट देवून ज्ञानसंपदेची माहिती करून घेतली.

ग्रंथ प्रदर्शनाचे उत्तम नियोजन व कार्यरचना केल्याबद्दल प्राचार्य राजेंद्र वारे व उपप्राचार्य विजय चव्हाण यांनी आयोजक अनुष्का काजरोळकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले.

Breaking News

जिल्हा परिषद आदर्श शाळा पुरस्कार जाहीर

रत्नागिरी,  (जिमाका) :- ग्रामीण भागातील शाळांना आदर्श शाळा पुरस्कार...