सावर्डे : गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाच्या वतीने राबविण्यात येणारा “हमारा विद्यालय – हमारा स्वाभिमान” हा संस्कारक्षम व प्रेरणादायी उपक्रम उत्साहात पार पडला.
या उपक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थिनी कुमारी श्रावणी राठोड हिने शालेय शिस्त व शाळेतील साधन संपत्तीची काळजी घेण्याचे महत्त्व याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. तर सहाय्यक शिक्षक दादासाहेब पांढरे यांनी राष्ट्रीयभाव व सामाजिक समरसता यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीतांचे सामूहिक गायन करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. सामाजिक समरसतेसाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.
मुख्याध्यापक राजेंद्रकुमार वारे यांनी नागरी कर्तव्यांचे पालन या विषयावर विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. शेवटी विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्रितपणे शाळा व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सामूहिक संकल्प व्यक्त केला. या कार्यक्रमाला विद्यालयाचे उपप्राचार्य विजय चव्हाण सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.