रत्नागिरीसावर्डे विद्यालय कोल्हापूर विभागात प्रथम , सह्याद्रीच्या शिरपेचा मानाचा तुरा

सावर्डे विद्यालय कोल्हापूर विभागात प्रथम , सह्याद्रीच्या शिरपेचा मानाचा तुरा

सावर्डे विद्यालय कोल्हापूर विभागात प्रथम , सह्याद्रीच्या शिरपेचा मानाचा तुरा
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा -3
👉सावर्डे -भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 या अभियानातील खाजगी शाळा विभागाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून सह्याद्री शिक्षण संस्थेच्या गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने सलग तिसऱ्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून विभाग स्तरावर रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधी केले. रत्नागिरी सातारा सांगली कोल्हापूर व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या शाळांचा यामध्ये समावेश होता. या शाळांच्या मधून प्रथम क्रमांक प्राप्त करण्याचा बहुमान सह्याद्रीच्या गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने पटकावला आहे व सह्याद्री शिक्षण संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
3 नोव्हेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत हे अभियान संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबविण्यात आले अत्यंत उत्स्फूर्तपणे या अभियानामध्ये विद्यालयाने सहभाग नोंदवून विद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या शालेय व सहशालेय उपक्रमाचे सादरीकरण केले. भाग अ पायाभूत सोयी सुविधा, भाग ब शासन ध्येय-धोरण अंमलबजावणी, भाग क शैक्षणिक संपादणूक या मुद्यांची पीपीटी व पीडीएफ फाईलच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष शाळेची तपासणी केली. पंचायत समिती चिपळूण गटशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षणाधिकारी यांचे सह सर्व पदाधिकारी, पालक शिक्षण प्रेमी व विद्यार्थ्यांचे या उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले.
या अभियानात विद्यालयाने पहिल्या वर्षी विभाग स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावून 15 लाख रुपयेचे पारितोषिक जिंकले आहे दुसऱ्या वर्षी जिल्ह्यात प्रथम क्रमांक व तिसऱ्या वर्षी विभागात प्रथम क्रमांक प्राप्त करून 21 लाख रुपये पारितोषिकाचे मानकरी ठरले आहे या यशाबद्दल प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमदार शेखरजी निकम, उपाध्यक्षा सौ. युगंधराताई राजेशिर्के, उपाध्यक्ष प्रशांतजी निकम डॉ.इसाक खतीब कार्याध्यक्ष अनिरुद्धजी निकम सह्याद्री शिक्षण संस्थेचे सर्व विश्वस्त सचिव महेश महाडिक संस्थेचे सर्व पदाधिकारी शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष व सर्व सदस्य पालक ग्रामस्थ व शिक्षण प्रेमींनी विद्यालयाचे अभिनंदन केले आहे.सुव्यवस्थित पायाभूत सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे सावर्डे विद्यालयाने केवळ यश मिळवले नाही, तर “आदर्श शाळा” म्हणून एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.

Breaking News